आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेत तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी चाळीसगावहून जळगावला आलेल्या २५ वर्षीय तरुणाने स्वत:ला पेटवून घेत तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल (मंगळवारी) दुपारी 3 वाजता शाहुनगर परिसरातील दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या आवारात घडली. शुभम ज्ञानेश्वर महाजन असे मृत तरुणाचे नाव आहे.

शुभमने लोणारी येथील महाविद्यालयातून 2014-15 मध्ये बीटेकचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर 2015-16 ला दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा क्लासेसमध्ये प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती. दरम्यान, मंगळवारी दुपारी दीड वाजता तो काशी एक्स्प्रेसने जळगावात आला. शाहुनगरातील दीपस्तंभ क्लासेसच्या अभ्यासिकेत काहीवेळ बसला. पावणे तीन वाजेच्या सुमारास तो गच्चीवर असलेल्या शौचालयात गेला. येथेच त्याने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. त्रास असह्य झाल्यानंतर त्याने गच्चीवरून खाली उडी घेतली. इमारतीच्या भिंतीला समांतर असलेल्या बदामाच्या झाडावर त्याने उडी घेतली होती. त्यामुळे झाडाच्या फांद्यादेखील तुटल्या. काय पडले हे पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना शुभम तडफडत असल्याचे दिसले. त्यांनी आरडा-ओरड करून शिक्षकांना सांगितले. सर्वांनी मिळून शुभमला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरू असताना दुपारी 4.45 वाजता त्याची प्राणज्योत मालावली. डॉ.प्राची सुरतवाला यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, शुभमचे काका तथा चाळीसगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक उत्तम महाजन हे वाजता रुग्णालयात पोहचले होते. शहर पोलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांनी घटनास्थळ मृतदेहाचा पंचनामा केला. सायंकाळी वाजता शुभमचा मृतदेह विच्छेनासाठी नेण्यात आला. बुधवारी सकाळी वाजता शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

शुभम होता अत्यंत हुशार अन् शांत
>  स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी चाळीसगावहून यायचा.
> दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या आवारातील घटना.
> बीटेकचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी.
>  शुभमच्या मृत्यूबाबत संशय बळावला.

शुभम हा अत्यंत हुशार शांत मुलगा होता. त्याच्या पश्चात एक बहीण आहे. दोघे जुळे होते. श्रद्धा देखील अभ्यासात हुशार आहे. दोघांनी 2015-16 मध्ये दीपस्तंभ येथे स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. तत्पूर्वी श्रद्धाने कराड येथून बीईची पदवी घेतली होती. ती सध्या पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तर त्यांचे वडील ज्ञानेश्वर महाजन हे करगाव (ता.चाळीसगाव) येथे आश्रमशाळेत शिक्षक आहेत. घरी चांगले शैक्षणिक वातावरण असून त्याचे कुणाशी काही वादही नव्हते. तरीदेखील शुभमने असा टोकाचा निर्णय का घेतला? याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांसह मित्रांना धक्का बसला आहे.

कुटुंबीयांनी व्यक्त केला संशय
शुभम हा अत्यंत शांत स्वभावाचा अभ्यासात हुशार होता. मंगळवारी घरून निघताना तो कोणत्याही दबावात किंवा तणावात नव्हता. जळगावात आल्यानंतर कोणाला भेटला? कोणाशी फोनवर किंवा भेटून त्याचे काही बोलणे झाले आहे का? छतावर जाताना त्याला कोणी पाहिले? त्याच्याजवळ पेट्रोल कोठून आले? हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे शुभमच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. आता पोलिसांनी या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी त्याचे वडील ज्ञानेश्वर महाजन काका उत्तमराव महाजन यांनी केली आहे.

मृतदेह पाहून वडिलांना भोवळ
चाळीसगावहून शुभमचे वडील ज्ञानेश्वर महाजन हे 5.30 वाजता रुग्णालयात पोहचले. मुलाचा मृतदेह पाहून त्यांना काहीच सुचेनासे झाले. मुलाच्या धक्क्याने त्यांना काही सेकंद भोवळ आली. सोबत आलेल्या नातेवाइकांनी त्यांना धीर देत रुग्णालयातून बाहेर आणले.

डोक्यात रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू
शुभमने उडी घेतल्यानंतर जमिनीवर त्याचे डोके आधी आदळले असावे. त्यामुळे त्याच्या डोक्यात रक्तस्राव झाला. याच कारणामुळे त्याचा मृत्यू झाला, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. मृतदेहाच्या पंचनाम्यात हेच कारण नमूद केले. मात्र, आगीमुळे तो ४५ टक्के भाजला.

हेही वाचा...
मिनिटभर जळतच राहिला शुभम; अंगावर पाणी, वाळू टाकून वाचवण्यासाठी मुलांनी केले प्रयत्न!
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...