आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनिटभर जळतच राहिला शुभम; अंगावर पाणी, वाळू टाकून वाचवण्यासाठी मुलांनी केले प्रयत्न!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गच्चीवरून उडी मारल्यानंतर आधी शुभम बदामाच्या झाडावर पडून नंतर जमिनीवर कोसळला. त्या वेळी तो जळतच होता. - Divya Marathi
गच्चीवरून उडी मारल्यानंतर आधी शुभम बदामाच्या झाडावर पडून नंतर जमिनीवर कोसळला. त्या वेळी तो जळतच होता.
‘दीपस्तंभ’तील सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासणार 
जळगाव - पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून घेतल्याने असह्य झालेल्या वेदनांमुळे शुभमने तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली उडी मारली. त्याच्या अंगातून निघणाऱ्या आगीच्या लोळामुळे पाहणाऱ्यांना भीतीपोटी क्षणभर काहीच सुचले नाही. त्यामुळे शुभम मिनिटभर जळतच राहिला. त्याच्या किंचाळ्या आणि विव्हळणे एेकून मुलांनी हिमतीने पुढे येत त्याच्या अंगावर पाणी, वाळू टाकून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तर आई घरी लवकर येतो, असे सांगून चाळीसगाव येथून काशी एक्स्प्रेसने जळगावात आलेला शुभम मंगळवारी घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याने घेतलेला आत्महत्येचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांसह मित्रांना चटका लावून गेला. 

शुभम ज्ञानेश्वर महाजन (वय २५) याने मंगळवारी दुपारी पाठीवर सॅक घेऊन दीपस्तंभ क्लासेसचे छत गाठले. छतावरील एका शौचालयात शिरून त्याने सोबत बाटलीत आणलेले पेट्रोल अंगावर टाकले. काडीपेटीने पेटवून घेताच आगीचा भडका उडाला. आगीने शरीराला लपेटल्याने त्याच्या शरीरातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. हा त्रास असह्य झाल्यामुळे त्याने थेट छतावरून खाली उडी घेतली. खाली असलेल्या बदामाच्या झाडावर कोसळल्याने झाडाच्या फांद्या तुटून तो वाळूवर पडला. तो पडल्यानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील पाच ते सहा विद्यार्थी आवाजाच्या दिशेने धावले. खाली काय पडले? आग कशी लागली याचा अंदाज घेत त्यांचे १५-२० सेकंद वाया गेले. त्यानंतर हे एका मुलाचे शरीर जळत असल्याचा अंदाज आल्याने त्यांचा अधिकच थरकाप उडाला. भेदरलेल्या विद्यार्थ्यांनी इतर मुलांना शिक्षकांना अारोळ्या दिल्या. तोपर्यंत त्याचे शरीर पेटतच होते. त्याच्या अंगातून आगीचे लोळ उठत हाेते. अखेर दोन ते चार जणांनी हिम्मत करून त्याच्या अंगावर माती पाणी टाकले. त्यामुळे आग विझली. तो जीवाच्या आकांताने तडफडत होता. काही मुलांनी तो शुभम असल्याचे ओळखले. मुले बोलत असल्याचे त्याला समजत हाेते. मात्र, नंतर काही सेकंदात तो बेशुद्ध झाला. मुलांनी शिक्षकांच्या मदतीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. 
 
मित्रांनाधक्का, कुटुंबीयांना संशय : शुभमच्या आत्महत्येमुळे त्याला जळगावात स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने ओळखणाऱ्या, सोबत राहणाऱ्या मित्रांना जबरदस्त धक्का बसला. तो गणित विषयात तरबेज असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. तसेच त्याचे काका उत्तमराव महाजन यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी रुग्णालयात उपस्थित असलेल्या अनेक मुलांना घटनेबद्दल माहिती विचारली. ‘आम्हाला काहीच माहिती नाही, शुभम आता नियमितपणे भेटतही नव्हता,’ अशीच उत्तरे सर्वांकडून मिळत होती. तसेच दीपस्तंभच्या शिक्षकांशीही त्यांनी संवाद साधला. सर्वांनीच अगदी शांततेची भूमिका घेतली होती. शुभमला छतावर जाताना पाहिलेच नाही. तो नियमित येत नसल्यामुळे काही सांगताच येणार नाही, असे शिक्षकांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी देखील तो कोणाला भेटला नाही की गप्पा मारल्या नाहीत, असे समोर आले. त्यामुळे महाजन देखील विचारात पडले होते. एवढा मोठा निर्णय शुभमने का घेतला? कोणीच त्याला रोखले, हटकले का नाही? या प्रश्नांनी त्यांच्या डोक्यात काहूर माजवले होते.
 
शुभम महाजन डॉक्टरांनी केले शर्थीचे प्रयत्न 
शुभमला रुग्णालयात आणल्यानंतर डाॅ.प्राची सुरतवाला यांच्या पथकाने सुमारे सव्वा तास शर्तीचे प्रयत्न करून उपचार सुरू ठेवला होता. त्याचा श्वासोच्छ्वास कमी होत असल्यामुळे अंबुबॅगच्या मदतीने त्याला कृत्रिम श्वास पुरवला जाता होता. अखेर त्याने दुपारी ४.४५ वाजता शेवटचा श्वास घेतला. 
 
शुभमला उन्हात जाण्याचा दिला सल्ला 
शुभम १० ते १५ दिवसांतून एकदा जळगावला येत होता. मंगळवारी तो दुपारी ११ वाजता घरातून निघाला. तेंव्हा वडिलांनी त्याला ऊन जास्त असल्यामुळे आज जाऊ नको. उद्या सकाळी लवकर जा, असा सल्ला दिला; पण शुभमने ऐकले नाही. तो दीपस्तंभमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. तसेच आता त्याला येथे शिकवण्यासाठी संधी मिळणार होती. यासाठीच तो प्रयत्नात असल्याचे वडिलांनी सांगितले. 
 
पुढील स्लाइडवर पाहा, 
- अाई, लवकर येताे... सांगून गेलेला शुभम घरी परतलाच नाही! 
- काकांचेराजकीय शैक्षणिक क्षेत्रात वजन 
- शुभम महाजन आमचा माजी विद्यार्थी 
​- शौचालयातसॅक आणि छतावर...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...