आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Demolish Swami Samarth Kendra, Mumbai High Court Bench Order

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वामी समर्थ केंद्राचे बांधकाम पाडा, जळगावातील केंद्राबाबत खंडपीठाचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगावातीलप्रतापनगरातील स्वामी समर्थ केंद्राचे बेकायदेशीर बांधकाम पाडून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. आदेश दिल्यापासून तीन महिन्यांच्या आत कारवाई करणे महापालिकेवर बंधनकारक आहे. त्यामुळे मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी गुरुवारी या जागेची पाहणी केली आहे.

प्रतापनगरात २०० फूट बाय १७० फूट जागा महापालिकेने शाळा स्वामी समर्थ केंद्राला विभागून दिली होती. यापैकी निम्म्या जागेवर केंद्राचा ताबा हाेता. महापालिकेच्या नगररचना विभागाच्या नियमानुसार सार्वजनिक जागेवर १० टक्केपेक्षा जास्त बांधकाम करता येत नाही. असे असतानाही केंद्राचे ९० टक्केपेक्षा जास्त बांधकाम करण्यात आले. त्यामुळे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.अ.वा.अत्रे, आर्किटेक्ट अरविंद चौधरी, डॉ.अरुणा पाटील, पीतांबर राणे यांच्यासह सहा जणांनी औरंगाबाद खंडपीठात २००२ मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. त्यात राज्य सरकार, नगररचना विभाग, महापालिका आयुक्त स्वामी समर्थ सेवा केंद्र यांना प्रतिवादी करण्यात आले होते. या याचिकेवर न्यायमूर्ती ए.व्ही.निरगुडे न्यायमूर्ती व्ही.के.जाधव यांच्या खंडपीठाने नुकताच निकाल दिला आहे. त्यात स्वामी समर्थ केंद्राला या जागेसंदर्भात कोणताही कायदेशीर अधिकार नाही, केंद्राचे त्या जागेवरील अस्तित्व फक्त अतिक्रमण आहे, केंद्राने केलेले बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर आहे, तसेच राज्य सरकार महापालिका यांनी बेकायदेशीर बांधकाम पाडून टाकावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहे. याचिकेवर निकाल झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत कारवाई करावी करून मूळ जागा जशी होती तशीच करावी, असे आदेशात म्हटले आहे.

स्वामी समर्थ केंद्रात दिवसभर सेवेक-यांची वर्दळ असते. गेल्या २५ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टने आता विशाल रूप धारण केले आहे. या ठिकाणी वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. पूजा, प्रार्थनेसाठी शहरातून सेवेकरी दाखल होत असतात. त्यामुळे मोठा वर्ग या केंद्राशी जोडला गेला आहे. औरंगाबाद खंडपीठाचा निकाल लागल्यानंतर ट्रस्टच्या माध्यमातून आजूबाजूच्या नागरिकांची ना-हरकत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.