आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक इमारत तरी तीन कुटुंबांचे ‘वास्तव्य’च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -शिवाजीनगर भागात १०४ वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या सध्या जीर्ण अवस्थेत असलेल्या दोन मजली घरामध्ये तीन कुटुंब राहत आहेत. घरमालकाने महापालिकेला पत्र देऊन घर पाडण्याची विनंती केली आहे. मात्र, भाडेकरूंच्या अट्टाहासामुळे घर पाडले जात नाही, अशी तक्रार आता घरमालकाने केली आहे.
शिवाजीनगर भागात भगवान केशरलाल तिवारी यांच्या मालकीचे घर आहे. या घरात सध्या तीन भाडेकरू राहतात. हे घर १०४ वर्षांपूर्वी बांधलेले असल्याने घराची पडझड झाली असून ही इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी कोसळू शकते. या संदर्भात प्रभाग अधिकारी अ.वा.जाधव यांनी पाहणी करून तसा अहवालही तयार केला आहे. मात्र, भाडेकरूंचा हे घर पाडण्यास विरोध होत असतो. ते स्वत:चा जीव धोक्यात घालून या इमारतीत राहत असल्याचे घरमालक तिवारी यांचे म्हणने आहे. या घरातील एक भाडेकरू व्यक्ती तर येथे लहान मुलांच्या शिकवण्याही घेतो. त्यामुळे येथे दररोज शाळकरी मुलांचेदेखील येणे-जाणे आहे. त्यामुळे पडक्या इमारतीचा प्रश्न अत्यंत धोकादायक झाला आहे.

१००घरमालकांना नोटीस
महापालिकेनेचालू वर्षात शहरातील जवळपास घरमालकांना जीर्ण घरे पाडण्याची नोटीस दिली आहे. ही घरे घरमालकांनी स्व खर्चाने पाडायची आहेत, अशी माहिती प्रभाग अधिकारी जाधव यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

घरमालक तिवारी यांनी १२ ऑगस्ट २०१४ रोजी महापालिकेला अर्ज करून घर जीर्ण झाल्यामुळे पाडण्याची विनंती केली आहे. महापालिकेने जानेवारी २०१५ रोजी तिवारी यांना नोटीस देऊन दिवसांच्या आत हे घर पाडण्याचे आदेश दिले आहेत. तर भाडेकरू घर पाडण्यास विरोध करत आहेत, असे लेखी पत्रक तिवारी यांनी ‘दिव्य मराठी’ला प्रसिद्धीस दिले आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणात दोष कुणाचा? दाेषी कुणाला ठरवणार? हे निश्चित करणे कठीण असून समन्वयाने हे प्रकरण मिटवण्याची वेळ आली आहे.

शेवटी दोषी कुणाला ठरवणार?
घराचा स्लॅब काेसळला असून ताे काेसळण्याची भीती अाहे.
शिवाजीनगरमधील याच पडक्या इमारतीत रहिवास असून येथे शिकवणीही घेतली जाते.

गुन्हा घरमालकांवर
पावसाळ्यातजीर्ण घरे कोसळण्याचे प्रकार घडत असतात. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून ज्या घरांना पाडण्याची नोटीस दिली जाते, अशा घरमालकांनी स्वखर्चाने घर पाडून घ्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जर नोटीस दिलेल्या मालकाने घर पाडले नाही ते पडून त्यात जीवित हानी झाली तर घरमालकावर गुन्हा दाखल होत असतो. या घराच्या बाबतीतही पालिकेने नोटीस दिली आहे. अशात जर, घर पडले तर याला जबाबदार कोण राहील? असा प्रश्न आता स्वत: घरमालकाने उपस्थित केला आहे.