आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिती डेंग्यूची : भुसावळ शहरातील ३६ हजार घरांचे सर्वेक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - नगरपालिकेच्या येथील आरोग्य विभागाने डेंग्यू निर्मूलनासाठी १० नोव्हेंबरपासून सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. आठवडाभरात आरोग्य विभागाच्या पथकाने शहरातील ३६ हजार ४४ घरांना भेटी देऊन तब्बल लाख १२ हजार ३८० कंटेनरची तपासणी केली. यात ११५४ कंटेनर दूषित आढळून आल्याने ते नष्ट करण्यात आले आहेत. यामुळे डेंग्यूच्या एडिस इजिप्ती डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण येईल.

शहरात डेंग्यूबाबत पालिकेची उदासीनता होती. मात्र, गत आठवड्यात पालिका प्रशासनाने संभाव्य धोका टाळण्यासाठी डी. एस. हायस्कूलच्या सभागृहात बैठक घेऊन १० ते १७ नोव्हेंबरदरम्यान डेंग्यू नियंत्रण आणि प्रबोधन सप्ताह राबवला. १० नोव्हेंबरपासून आरोग्य विभागाच्या परिचारिका, पल्स पोलिओ मोहिमेच्या स्वयंसेविका, आशा वर्कर्स, मलेरिया विभागाचे कर्मचारी आदींनी शहरात सर्वेक्षण मोहीम राबवली. या मोहिमेत दीनदयाळनगर, जामनेररोड, खडकारोड, जाम मोहल्ला, वांजोळा रोडवरील संपूर्ण वसाहती, जळगावरोड, शांतीनगर, प्रभातनगर, तापीनगरातील सर्व विस्तारित भाग, विठ्ठल मंदिर वॉर्ड, मॉर्डनरोड, आगाखानवाडा, जुना सतारा, मामाजी टॉकीज परिसर अशा विविध भागांमधील ३६ हजार ४४ घरांवर मार्किंग करून तपासणी करण्यात आली आहे.

^गेल्या आठवडाभरात डेंग्यूबाबत प्रबोधन करण्यात आले. हजार १५४ दूषित कंटेनर आढळून आले असून ते नष्ट करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही माहितीपत्रकांद्वारे उपाययोजनांची माहिती घराघरांमध्ये पोहोचवली. डॉ.कीर्ती फलटणकर, महिलावैद्यकीय अधिकारी, भुसावळ

-सर्वेक्षणात शहरातील विविध भागांत ३६९ तापाचे संशयित रुग्ण आढळून आले. त्यातील १६३ जणांनी रक्ताचे नमुने दिले आहेत. प्रयोगशाळेत तपासणी करून या रुग्णांना त्यांच्या रक्त तपासणीचा अहवाल देण्यात येणार आहे.
- शहरात मंगळवार आणि बुधवारी दोन स्वतंत्र पथकांकडून ही तपासणी केली जाईल. याबाबतचा स्वतंत्र वस्तुनिष्ठ अहवालही जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे पाठवला जाणार आहे.
-आरोग्य विभागाकडून गजानन महाराजनगरच्या उत्तर-पश्चिमेकडील विरळ वस्ती, खडकारोडवरील किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या मुस्लिम कॉलनी भागांतही तपासणी करण्यात येईल.
- आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ३६९ जणांना तापाची लागण झाल्याचे आढळून आले. तापावर नियंत्रण मिळवण्यासाठी ८०२ क्लोरोफिन आिण पॅरासिटामॉलच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
घरांवर केले डी-मार्किंग
घरांवर डी मार्किंग करून कंटेनर सर्वेक्षण, तापाच्या रुग्णांची संख्या, तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने संकलन आणि उपाययोजन म्हणून औषधांचे वाटप करण्यात आले. आरोग्य विभागाच्या पथकाने ठिकठिकाणी प्रात्यक्षिकाद्वारे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती कशी होते? याबाबतची माहिती दिल्याने नागरिकांमध्ये प्रबोधन झाल्याने धास्ती काही अंशी कमी झाली.
दीड लाख नागरिकांशी संपर्क
आठवडाभरात पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात ३६ हजार ४४ घरांमधील लाख ५४ हजार ३४१ नागरिकांशी संपर्क साधून त्यांना डेंग्यूबाबत माहिती दिली. कोरडा दिवस पाळणे, स्वच्छता राबवणे, अंग झाकले जाईल असे कपडे वापरणे आदींसह डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाय सांगण्यात आले. शाळा, महाविद्यालयांनीही जनजागृती केली आहे. परंतु चौकाचौकात साचलेला कचरा, कचराकुंड्यांची झालेली दुरवस्था, सांपडाण्यात योग्य पद्धतीने होत नसलेला निचरा ही कारणे सार्वजनिक आरोग्याला बाधा पोहोचवणारी आहेत. धुरळणीकडेही गांभीर्याने पाहिले जात नसल्याची ओरड वाढत आहे. या गोष्टींकडे पालिकेने आता लक्ष पुरवणे गरजेचे आहे.