आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरपूरमध्ये दाेन मुलांचा डेंग्यूने मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरपूर - शिरपुरातील दाेन शालेय विद्यार्थ्यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. दाेन्हीही विद्यार्थी पांडू बापू माळी विद्यालयात आठवीत शिकत होते. त्यांच्यावर गेल्या अाठ ते दहा दिवसांपासून उपचार सुरू हाेते.

कार्तिक सुनील माळी (१३) अाणि हर्षल बापू माळी (१३) या दाेन्ही जणांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात अाणि नंतर नगरपालिकेच्या इंदिरा मेमाेरियल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात अाले हाेते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नगरपालिकेने केलेल्या तपासणीत हे विद्यार्थी ज्या भागात राहत होते, त्या भागातील दाेन घरांतील फ्रीजच्या पाण्यात डेंग्यूचे डास अाढळून अाल्याची माहिती नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी माधव पाटील यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर या भागातील नागरिकांनी नगरपालिकेवर माेर्चा काढत निवेदन दिले. डेंग्यूची साथ राेखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात केली.
बातम्या आणखी आहेत...