आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यू नियंत्रणात मनपा पंगू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, यावर नियंत्रण ठेवण्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा कुचकामी ठरते आहे. पालिकेच्या दप्तरी अडीच महिन्यात तब्बल ५७ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याची नोंद आहे. मात्र, खासगी रुग्णालयांमधील स्थिती लक्षात घेता डेंग्यूच्या रुग्णांनी शंभरी ओलांडली ही वस्तुस्थिती आहे. सोमवारी मोहननगरात एका घरातल्या पाण्याच्या टाकीत डेंग्यू सदृश्य अळ्या आढळून आल्या. त्यामुळे शहरात डेंग्यूला आळा घालण्यासाठी प्रभावी प्रयत्नांची गरज व्यक्त होत आहे.
शहरात डेंग्यूचा विळखा वाढत आहे. घरांमध्ये साठवून ठेवलेले पाणी, बदलते वातावरण, परिसरातील अस्वच्छतेमुळे सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. डेंग्यूसोबतच मलेरिया इतर साथीच्या आजाराने रुग्ण त्रस्त आहेत. यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग आणि डास िनर्मूलनासाठी काम करणाऱ्या यंत्रणेत समन्वय नसल्याने याचे दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहेत.
सध्या पालिकेने घरोघरी जाऊन सर्वेक्षण यंत्रणा हाती घेतली आहे. त्यामुळे काहीअंशी परिस्थिती नियंत्रणात असली तरी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही.
महापालिकेचा नियमित सर्व्हे
बदलतेराहणीमान आणि अस्वच्छतादेखील डेंग्यूच्या आजाराला कारणीभूत आहे. स्वच्छता केल्यास काहीअंशी डेंग्यूही कमी होईल. पालिकेचा नियमित सर्व्हे सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आहे. सध्या डेंग्यूचे डास आढळलेल्या भागातच धुरळणी केली जात आहे. डॉ.एस.जे. पांडे, आरोग्यनिरीक्षक,मनपा