आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांच्या सहकार्याने रोखणार "डेंग्यू'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला असून डेंग्यूचे प्रस्थ वाढत चालले आहे. डेंग्यूला आळा घालण्यासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळेच आता पालिकेने विद्यार्थी, पालक तसेच सामाजिक संस्थांना या अभियानात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेतील नोंदीनुसार जळगाव शहरात ५७ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांमधील आकडा काही वेगळाच आहे. तरीदेखील महापालिका प्रशासन सुस्त असल्याबाबत ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने डेंग्यूला आळा घालण्यासाठी उशिरा का होईना हातपाय हलवायला सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाकडून होणाऱ्या उपाययोजना अपूर्ण पडत असल्याने आता पालिका प्रशासनाने जळगावकर नागरिकांनाच आवाहन करून अभियानात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शाळांमधील मुलांमध्ये जनजागृती करून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती आजार याबाबत जनजागृती केली जाणार आहे. याकरिता शहरातील शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक बोलावून शालेयस्तरावर उपक्रम राबवले जाणार आहेत. यासाठी खास बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश उपायुक्त अिवनाश गांगोडे यांनी दिले आहेत.