आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dengue Fever In Bhusawal Taluka 11 Old Girl Admitted In Hospital

भुसावळ शहरासह परिसरात पुन्हा डेंग्यूची लागण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- शहरात नातेवाइकांकडे पाहुणी म्हणून राहायला आलेल्या ११ वर्षीय बालिकेस डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. पिंपळकोठा (ता. एरंडोल) येथील रहिवासी असलेल्या या बालिकेवर शहरातील ओम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शहरातील महाजन इलेक्ट्रीकचे संचालक महेंद्र महाजन यांच्याकडे पूर्वा सुनील जाधव (वय ११, रा.पिंपळकोठा) ही बालिका पाहुणी म्हणून आली होती. गेल्या आठवड्यापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला डॉ.हेमंत अग्रवाल यांच्या ओम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या गुरुवारी (दि.२) या बालिकेला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. रुग्ण बालिकेच्या प्लेटलेट‌्स कमी झाल्याने रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यात ितला डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. दरम्यान, या बालिकेची प्रकृती आता धोक्याबाहेर असून, दोन-चार दिवसांत तिला दवाखान्यातून सुटी देण्यात येणार आहे. दरम्यान, पालिकेकडून शहरात डेंग्यूच्या नियंत्रणासाठी कंटेनर तपासणी करण्यात येत आहे. असे असताना डेंग्यू नियंत्रणात येत नसल्याचे दिसून येतेय. गेल्या आठवड्यात दोन बालिकांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे नगराध्यक्ष पिंजारी यांनी आरोग्य विभागाची तत्काळ बैठक घेऊन उपाययोजनेच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आरोग्य विभागाने दखल घेतली नाही, हे रुग्ण आढळल्यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

दक्षता शून्य
डेंग्यूच्यानियंत्रणासाठी कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे. मात्र, आरोग्य विभागाकडून केवळ कागदावर कोरडा दिवस पाळला जातो. शहरात दक्षता घेण्याचे प्रमाणही शून्यच आहे.

बोदवडमध्ये रुग्ण वाढले
बोदवड तालुक्यातील पळासखेडा येथील मनीषा गजानन पवार (वय ८) या बालिकेलाही डेंग्यूची लागण झाली आहे. तसेच येवती येथील विजय पाटील (वय १०), जलचक्र तांडा येथील नसरीनबी जावेद मुलतानी (वय ४), पळासखेडा येथील अर्चना सुरवाडे (वय १८), चिखली शेवगे येथील सुनील पवार (वय १८) यांच्यातही डेंग्यूसदृश लक्षणे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.