आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळ शहरात डेंग्यूसदृश आजाराचे नऊ रुग्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- संततधार पावसामुळे गेल्या चार दिवसांपासून शहरात सूर्यदर्शन झालेले नाही. परिणामी विषाणूजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मेंदूज्वर, मलेरिया, टायफाइड, दमाचे रुग्ण दवाखान्यांमध्ये दाखल झालेले आहेत. शहरातील चार हॉस्पिटलमध्ये डेंग्यूसदृश आजारांच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

डॉ. राजेश मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये विष्णू तिवटे (वय 20, तरोळा, ता. मुक्ताईनगर), आम्रपाली सुरवाडे (वय 17, हरताळा, ता. मुक्ताईनगर), सचिन र्शीरामे (वय 22, भुसावळ), डॉ. रेखा पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये चेतना पाटील (वय 1 वर्ष, यावल), तेजस्विनी जाधव (वय 4 महिने, जामनेर), चरण पाटील (वय 5 वर्षे, बेलखेडा, ता. भुसावळ), दुर्गेश भगत (4 वर्षे, घोडसगाव, मुक्ताईनगर), डॉ. दीपक जावळे यांच्या हॉस्पिटलमध्ये विजय फिरके (वय 40, नाडगाव, ता. बोदवड), नितीन चौधरी (वय 40, भुसावळ) या डेंग्यूसदृश रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पावसाळ्यात साचलेल्या कचर्‍यामुळे डासांची उत्पत्ती होऊन त्यातूनच साथीच्या आजारांचा फैलाव होतो. स्वच्छतेवर भर दिला पाहिजे. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नये, असा सल्ला डॉ. दीपक जावळे यांनी दिला आहे.

स्वच्छतेवर भर द्यावा
उपचारासाठी दाखल झालेल्या चार बालकांमध्ये पांढर्‍या रक्तपेशींची संख्या कमी झाल्याचे आढळून आले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी घरातील स्वच्छतेवर भर द्यावा.
-डॉ. रेखा पाटील, बालरोग तज्ज्ञ, भुसावळ