आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"डेंग्यू'ने शहरात पाय पसरण्यापूर्वीच पायबंद घाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सर्दी-खोकला, ताप यासारख्या व्हायरल आजारांपाठोपाठ आता डेंग्यूनेही शहरात आगमन केले आहे. तांबापुरा व शिवाजीनगरसारख्या भागात शाळकरी मुलांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आली आहेत. दोन वर्षांपूर्वी पिंप्राळा-हुडको भागात या आजाराने थैमान घातले होते. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्यापूर्वी महापालिकेने यासंदर्भात शहरात सर्वेक्षण करून उपाययोजना व जनजागृती करणे गरजेचे आहे.
प्रत्येक दवाखान्यातील ओपीडीत वाढ झाली आहे. सर्दी-खोकला व ताप हे आजार आता सामान्य वाटू लागले असून, सध्या मलेरिया व टायफॉइडचे प्रमाण दोन महिन्यांच्या तुलनेत वाढले आहे. त्यापाठोपाठ शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूची लक्षणे असलेले रुग्ण दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. डेंग्यू हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यूचा विषाणू ‘एडिस इजिप्ती’ जातीचा असतो. लहान मुलांमध्ये सौम्य स्वरूपाचा, तर मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप असतो. डॉ. निखिल पाटील यांच्या मते, याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.
लक्षणांवर ठेवा बारीक लक्ष
अचानक तीव्र ताप येणे, तीव्र स्वरूपात पुढच्या बाजूने डोकेदुखी, डोळ्यांच्या मागील भागात वेदना हाेणे, स्नायू आणि सांध्यांमधे वेदना, जेवणाची चव न समजणे व भूक न लागणे, अंगावर गोवरसारखे पुरळ येणे, मळमळणे आणि उलट्या, रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे, झोप येणे आणि अस्वस्थता, रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडते, नाडी कमकुवत होऊन जलद चालते, श्वास घेताना त्रास होणे. डास चावू नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी झोपताना अंग झाकणारे कपडे घालावेत. तसेच मच्छरदाणीचा वापर करावा.ॉ
कसा असतो ‘एडिस इजिप्ती’ डास?
आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यूचा विषाणू ‘एडिस इजिप्ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीमध्ये संक्रमित केले जातात. हे डास साधारणपणे समुद्रसपाटीपासून १००० मीटरपर्यंतच्या भागात जिवंत राहतात. या आजाराची साथ वेगाने पसरू शकते. ‘एडिस इजिप्ती’ हा एक लहान व काळा डास असून, त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. तसेच त्याचा आकार अंदाजे 5 मिलिमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला 7 ते 8 दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो. साधारणपणे हे डास सकाळी अथवा संध्याकाळी चावतात.
डेंग्यूमुळे उद‌्भवू शकते रक्तस्रावाची भीती
हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून, यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्राव होणे, चट्टे पडणे, हिरड्यांमधून रक्तस्राव, अंतर्गत रक्तस्राव-आंत्रामधून रक्तस्राव, प्लेटलेट्सची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छाती व पोटात पाणी जमा होऊ शकते.