आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रॅपिड डायग्नाेस्टिक टेस्ट किट’ डेंग्यूच्या निदानासाठी वापरू नका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यभरात डेंग्यूचा प्रभाव झपाट्याने वाढत असून दरराेज माेठ्याप्रमाणात पाॅझिटीव्ह रिपाेर्ट येत अाहेत. यामुळे अाराेग्य यंत्रणेवर प्रचंड भार पडू लागला अाहे. शासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली अाहे. डेंग्यूसंदर्भात काेणत्याही परिस्थितीमध्ये या अाजाराच्या निश्चित निदानासाठी ‘रॅपीड डायग्नाेस्टीक टेस्ट कीट’चा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले अाहेत.
जळगाव शहरात गेल्या महिनाभरात माेठ्याप्रमाणात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत चालली अाहे. ताप, अंगदुखी वाणत्या ही लक्षणे असलेल्या रुग्णांच्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये डेंग्यू पाॅझिटीव्ह येत असल्याने खासगी रुग्णालयांमधील अाकडा ५०० पेक्षा जास्त असला तरी पालिकेच्या दप्तरी डेंग्यू सदृश रुग्णांची नाेंद केवळ २८०च्या जवळपास अाहे. अाजाराने त्रस्त रुग्ण हाॅस्पिटलमध्ये अॅडमीट झाल्यानंतर डाॅक्टर त्यांंच्या रक्त नमुन्यांची तपासणी करून घेत अाहेत. रक्ताचा अहवाल काय येताे? यावर रुग्णावरील अाैषधाेपचार ठरवला जाताे. एनएस-१ ही स्क्रीनिंग टेस्ट सुमारे अर्धा तासात हाेत असल्याने त्यावर अधिक भर दिला जात अाहे. त्यानंतर डाॅक्टरांच्या माध्यमातून उपचार सुरू केले जात अाहेत. परंतु पालिका प्रशासनाला स्क्रीनिंग टेस्ट मान्य नाही. यासंदर्भात राज्य शासनाच्या अाराेग्य यंत्रणेनेदेखील अादेश दिले अाहेत. त्यात डेंग्यूसंदर्भातील काेणत्याही परिस्थितीत अाजाराच्या निश्चित निदानासाठी ‘रॅपीड डायग्नाेस्टीक टेस्ट कीट’चा वापर करण्यात येऊ नये, असे निर्देश देण्यात अाले अाहेत. त्यामुळे शहरातील काही डाॅक्टरांनी अाता इलायझा टेस्टसाठी कीट खरेदी करण्याची तयारी सुरू केली अाहे.

रुग्णाच्या रक्त तपासणी शुल्कबाबत मतभिन्नता
डेंग्यू अाजाराचे निदान काही खासगी रुग्णालय प्रयाेगशाळा तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांमार्फत केले जाते. यात डेंग्यूचे निदान करणाऱ्या एनएस-१ इलायझा मॅक इलायझा या तपासणीसाठी अंदाजे ८०० ते १५०० रुपये अाकारले जातात. ही रुग्णांची अार्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी राज्य शासनाने अादेश जारी केले अाहेत. यात या दाेन्ही पद्धतीने चाचणी करण्यासाठी ६०० रुपये अाकारणीचे निर्देश दिले अाहेत. परंतु सध्या वैद्यकीय क्षेत्रात एनएस-१, अायजीजी अायजीएम या तीन प्रकारच्या तपासणीसाठी प्रत्येकी ६०० रुपये अाकारणी करावेत, असा शासनाच्या अादेशाचा अर्थ काढला जात अाहे. तसेच यापुढे प्रत्येक अहवालाच्या खाली सूचना देण्याबाबतही जनजागृती केली जात अाहे.

शहरात पुन्हा १२ रुग्ण अाढळले
खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असलेल्या सुमारे १२ रुग्णांना डेंग्यू पाॅझिटीव्ह असल्याचे प्राथमिक रिपाेर्ट प्राप्त झाले अाहेत. एनएस-१ स्क्रीनिंग टेस्ट असल्याने यासंदर्भात पालिकेकडून अद्याप त्यावर शिक्कामाेर्तब करण्यात अालेले नाही. तर मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. राम रावलानी हे रविवारी शहरातील काही भागात फिरून डेंग्यूसंदर्भात सुरू असलेल्या कामाची पाहणी करत हाेते.
बातम्या आणखी आहेत...