आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूने पसरले पाय; घाटीच्या अहवालात नमुने पाॅझिटिव्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - घराघरात तापाचे रुग्ण अाढळत असून, डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले अाहे. गेल्या पंधरा दिवसांत पालिकेच्या दप्तरी ३०६ डेंग्यूसदृश रुग्णांची नाेंद झाली असली तरी, हा अाकडा यापेक्षा खूपच माेठा अाहे. शहरात अाठवडाभरात डेंग्यूने पाय पसरले असून, साेमवारीदेखील सुमारे १५ डेंग्यूसदृश रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाले अाहेत. विशेष म्हणजे, गेल्या अाठवड्यात अाैरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तपासणीसाठी पाठवलेले १७पैकी रुग्णांच्या रक्ताचे नमुने डेंग्यू पाॅझिटिव्ह निष्पन्न झाले अाहेत.
डेंग्यूचे रुग्ण अाढळत असल्याने मनपाने अाता प्रत्येक घरापर्यंत पाेहोचण्याचा निर्णय घेतला अाहे. डेंग्यूचे संशयित रुग्ण असलेल्या ७९ काॅलन्यांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले अाहे. खासगी रुग्णालयांतील डेंग्यू संशयितांचा अाकडा पाचशेच्या वर असला तरी, मनपाने ३०६ संशयित रुग्ण असल्याचे जाहीर केले अाहे. १५ दिवसांत ३०६पैकी २९६ रुग्णांच्या घरांच्या परिसरात पाहणी केली. २९६ रुग्ण हे ७९ काॅलन्यांमधील रहिवासी असून, मनपाने या काॅलन्यांवर लक्ष केंद्रित केले हाेते, तर काॅलन्यांतील १० संशयितांच्या परिसरातही अॅबेटिंग धुरळणी केली जात अाहे.

पॅथाॅलाॅजिस्ट संभ्रमात
शासनाने एनएस-१ तपासणी करून डेंग्यूचा अहवाल देऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले अाहेत. एमडी पॅथाॅलाॅजिस्टच्या मतानुसार एनएस-१ अलायझा चाचणीत फार काही फरक नाही. अतितातडीच्या रुग्णावर उपचारासाठी एनएस-१ चाचणी उपयाेगी ठरून तातडीने उपचार केला जात असल्याचे सांगितले जात अाहे. त्यानुसार दरराेज डेंग्यू पाॅझिटिव्हचा अाकडा वाढत चालला अाहे. यामुळे अाराेग्य यंत्रणेवर ताण पडत अाहे. शासनाच्या अादेशाचे पालन करायचे म्हटल्यास रुग्ण अाल्यास त्याच्या रक्ताची चाचणी करायची की नाही? असा प्रश्न शहरातील पॅथाॅलाॅजिस्ट विचारू लागले अाहेत. त्यात डीएमएलटी लॅबचालकांकडे डेंग्यू पाॅझिटिव्हच्या किती चाचण्या झाल्या? याची खरी माहिती अाराेग्य यंत्रणेकडे नाही.

नऊ महिन्यांत एकूण १४ रुग्ण पाॅझिटिव्ह
जानेवारीते सप्टेंबरदरम्यान महापालिकेच्या अाराेग्य विभागाने १० नमुने तपासणीसाठी पाठवले हाेते. त्यापैकी रुग्ण पाॅझिटिव्ह, तर निगेटिव्ह अाले हाेते, तर गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये १७ नमुने घाटी रुग्णालयात पाठवले हाेते. त्यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून, त्यातील रुग्णांना डेंग्यू पाॅझिटिव्ह निष्पन्न झाला अाहे. त्यामुळे शहरात डेंग्यूची साथ असल्याचे स्पष्ट झाले अाहे.

१५ दिवसांत अाढळले ४७२ तापाचे रुग्ण
डेंग्यूचीसाथ पसरत असल्याने अाराेग्य विभागाकडून करण्यात अालेल्या सर्वेक्षणात १८ सप्टेंबर ते अाॅक्टाेबरदरम्यान ५२ हजार ९१४ घरांची तपासणी करण्यात अाली. त्यात हजार ४९६ घरांमध्ये डासांच्या अळ्या अाढळून अाल्या. तसेच हजार ३७८ घरांतील भांड्यांमध्ये अळ्या अाढळून अाल्या अाहेत. या सर्वेक्षणात १५ दिवसांत ४७२ तापाचे रुग्ण निष्पन्न झाले असून, त्यांच्या रक्ताचे नमुने घेतल्याची नाेंद करण्यात अाली अाहे.

या भागांत अधिक रुग्ण
अयाेध्यानगर,शिव काॅलनी, पिंप्राळा, जुने जळगाव, खाेटे नगर येथील अाेम शांतीनगर.
७९ काॅलन्यांमध्येअातापर्यंत सर्वेक्षण
५२हजार९१४ घरांची अातापर्यंत तपासणी
साेमवारी १५ रुग्ण खासगी रुग्णालयांत दाखल
गेल्या महिनाभरात शहरात तीन जणांचा डेंग्यूसदृश अाजाराने मृत्यू झाला. यात एक बालक, एक विवाहिता अाणि एका तरुणाचा समावेश हाेता. तसेच साेमवारी १५ डेंग्यूसदृश रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...