आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या पुन्हा वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेसाठी दक्षता न घेतल्याने शहर आणि तालुक्यात आता डेंग्यूने डोके वर काढले आहे. शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूसदृश आजारांच्या 10 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य सेवकांनी शहरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. तर ग्रामीण भागातील उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वासुदेव मावळे यांनी मंगळवारी स्वत: द.शि.विद्यालयात तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेतली. साथरोगांचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना सूचना द्याव्यात, असे त्यांनी या वेळी सांगितले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.एम.चौधरी, डॉ.अनिल पांढरे, डॉ. प्रमोद पांढरे, डॉ.शिवराज पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे 70 कर्मचारी उपस्थित होते.

मेंदूज्वर, मलेरिया, टायफाइड, दमा या व्याधींनी ग्रस्त रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. यामध्ये डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. सायली पाटील (वय 13, रा.वरणगाव), नम्रता पाटील (वय 10, रा.पिंपळगाव खुर्द), इशा देवरे (वय 4 महिने, रा.दीपनगर), रोहन नरवाडे (वय 2 वर्ष, रा.फैजपूर), नितीन चौधरी (वय 43, रा.तापीनगर, भुसावळ) या रुग्णांना डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे आढळली आहेत. पालिका रूग्णालयात डायरिया आणि मलेरियाग्रस्त प्रत्येकी एक आणि न्यूमोनियाचे तीन अशा पाच रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

डेंग्यूच्या दोन रुग्णांवर उपचार
शहरातील डॉ.दीपक जावळे यांच्या हॉस्पिटलमध्ये भावना जोशी (वय 28, रा.बालाजी मंदिर परिसर)आणि शरद उपाध्याय (वय 25, रा.उत्तर प्रदेश) या दोघांना डेंग्यूचे निदान झाल्याचे डॉ.जावळे यांनी सांगितले.

दक्षता घ्यावी
लहान बालकांच्या आरोग्यावर विषाणूजन्य आजारांचा परिणाम लवकर जाणवतो. त्यामुळे नागरिकांनी बालकांच्या आरोग्याविषयी योग्य दक्षता घेणे आवश्यक आहे.
-डॉ.पंकज राणे, बालरोग तज्ज्ञ