आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव शहरात महिनाभरात अाढळले ५३१ डेंग्यूसदृश रुग्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात डेंग्यूच्या अाजाराने जीव गमवावा लागत असल्यामुळे पुन्हा डेंग्यूच्या तापाने नागरिक भयभीत झाले अाहेत. महापालिकेच्या अाराेग्य यंत्रणेने गेल्या ३३ दिवसांत ९२ भागांमध्ये सर्वेक्षण केले अाहे. यात ५३१ रुग्ण डेंग्यूसदृश अाढळले असून ८९५ रुग्णांत तापाची लक्षणे निष्पन्न झाली अाहेत.

गेल्या काही दिवसांत खासगी रुग्णालयांमध्ये तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले हाेते. मध्यंतरी ते प्रमाणात काहीसे कमीदेखील झाले. परंतु, पुन्हा डेंग्यूच्या लक्षणे असलेला रुग्ण दगावल्याची घटना घडल्याने पुन्हा डेंग्यूने डाेकेवर काढल्याचे वातावरण निर्माण झाले अाहे. गत काळातील अनुभव लक्षात घेता महापालिकेच्या अाराेग्य विभागाने शहरातील जवळजवळ सर्वच भागात म्हणजे ९२ काॅलन्यांमध्ये अाजूबाजूच्या परिसरात सर्वेक्षण केले हाेते. यात तब्बल लाख ७६ हजार ६७३ घरांना भेटी देण्यात अाल्या अाहेत. यात हजार ७७० घरे पाॅझिटिव्ह अाढळली असून या घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या असल्याचे निष्पन्न झाले अाहे.

८८१ रक्ताचे नमुने
महापालिकेच्यापथकांनी केलेल्या तपासणीत लाख १६ हजार ७०८ पाण्याची भांडी तपासण्यात अाली हाेती. त्यातील १२ हजार ३९९ कंटेनरमध्ये अळ्या अाढळून अाल्या अाहेत. त्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वत: हजार ८१३ कंटेनर रिकामे करून घेतले हाेते. तर १० हजार ५९१ कंटेनरमध्ये अॅबेटिंग केले अाहे. संपूर्ण शहरात डेंग्यूसदृश ५३१ रुग्णांव्यतिरिक्त ८९५ तापाचे रुग्ण अाढळले हाेते.

३३ दिवसांत तपासणी; ८,७७० घरे पाॅझिटिव्ह
महापालिकेच्या पथकाने १८ सप्टेंबर ते २१ अाॅक्टाेबरदरम्यान केलेल्या तपासणीचा अहवाल महापालिका अायुक्तांकडे सादर केला अाहे. यात शहरातील सहा भागांमध्ये २० पेक्षा जास्त डेंग्यूसदृश रुग्ण अाढळून अाले अाहेत. अयाेध्यानगरात सर्वाधिक ७३ रुग्णांची नाेंद करण्यात अाली अाहे. तर पिंप्राळा ३४, खाेटेनगर परिसर ३०, मेहरूण अक्सानगर परिसर २४, शिव काॅलनी २३, गणेश काॅलनीमध्ये २२ रुग्ण अाढळून अाले अाहेत. उर्वरित भागात कमी अधिक प्रमाणात रुग्ण अाढळले अाहेत. यापुढेही ही माेहीम सुरूच राहणार असल्याचे अाराेग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...