आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूने काढले डोके वर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अत्यल्प प्रमाण असलेल्या डेंग्यू आजाराने महिनाभरात डोके वर काढले असून, डेंग्यूमुळे बहुसंख्य रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. तसेच पांढर्‍या पेशी कमी झाल्याची तक्रार असलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. महिनाभरात रेडक्रॉसकडून सिंगल डोनर प्लेटलेटच्या 24 पिशव्या देण्यात आल्या असून, बहुसंख्य रुग्ण डेंग्यूसदृश आजाराने दाखल असलेले आहेत.

यंदा चांगला पावसाळा झाल्याने होणारी घाण वाहून गेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षापेक्षा यंदा रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण कमी आढळत आहेत. तथापि, महिनाभरापूर्वी बोटावर मोजण्याइतके रुग्ण असताना या पंधरवड्यात मात्र डेंग्यूच्या आजाराचे प्रस्थ वाढले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी-ताप व खोकल्याच्या रुग्णांसोबत चढ-उताराच्या तापाचे असंख्य रुग्णही दाखल होत आहेत.

दरम्यान, महापालिका प्रशासनाकडे जानेवारीपासून ते आतापर्यंत केवळ 61 डेंग्यूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे; परंतु गेल्या पंधरा दिवसांत डेंग्यूसदृश आजाराचे शेकडो रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यात जळगाव शहरापेक्षा ग्रामीण भागातील रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे नोंदीवरून स्पष्ट होते.

महापालिका प्रशासन झोपेतच
शहरात डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण दाखल होत असताना महापालिका प्रशासनाला मात्र त्याचा पत्ताच नसल्याचे स्थिती आहे. प्रशासनाच्या नोंदीनुसार हा आकडा अत्यंत कमी आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने यासंदर्भात माहिती घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होते आहे.