आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - शहरात शुक्रवारी डेंग्यूमुळे साडेतीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. डेंग्यूचे रुग्ण ग्रामीण भागातील असल्याचे सांगून फैलावाकडे दुर्लक्ष करणार्या पालिकेच्या आरोग्य विभागाला यामुळे मोठी चपराक बसली आहे.
गेल्या वर्षी डेंग्यूने 12 पेक्षा अधिक जणांचा बळी घेतल्यानंतर या वर्षीचा हा पहिला बळी ठरला आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने बुधवारी प्रसिद्ध केल्यानंतरही महापालिका उपाययोजना करण्यात अपयशी ठरली आहे.
जळगावातील नशेमन कॉलनीतील इस्माईल चौधरी यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा फरहान चौधरी याचा शुक्र वारी दुपारी मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात गुरुवारी त्याला ताप आला होता. त्यानंतर सायंकाळी प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला रिंगरोड येथील चिरायू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या दरम्यान त्याला दोन वेळा झटकेही आले. व्हायरल इन्फेक्शन असल्याने औषधोपचार सुरू होते. गुरुवारी रक्ततपासणीच्या अहवालात फरहानला आयजीजी पॉझिटिव्ह (डेंग्यू) असल्याचे निष्पन्न झाले. उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.