आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेस्ट ट्यूब फुटली; डेंग्यूचे डास पळाले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगावात थैमान घातलेल्या डेंग्यूमुळे महापालिका कामाला लागली होती. रामेश्वर कॉलनी परिसरात दोन रुग्ण आढळल्याने महापालिकेने मोठ्या शर्थीने त्या परिसरातील डास पकडून पुणे येथील एनआयव्ही या संस्थेकडे पाठविले होते. तपासणीसाठी डास भरून पाठविण्यात आलेली टेस्ट ट्यूब फुटल्याचा निरोप मनपात आल्याने डेंग्यूच्या अहवालावर पाणी फिरले आहे.
डेंग्यूची खातरजमा करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने 30 डिसेंबर रोजी रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले होते, तर त्या परिसरातील डास पकडून 5 जानेवारीला पुण्यातील एनआयव्ही या संस्थेकडे पाठविले होते. नमुने पाठवून पंधरा दिवस उलटल्याने महापालिका अहवालाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र, झाले भलतेच अहवालाऐवजी पुण्यातून निरोप आला. नमुने पाठविलेली टेस्ट ट्यूब फुटली, नव्याने डास पाठवा. या भलत्याच निरोपाने आरोग्य विभागाने डोक्याला आठ्या पाडल्या आहेत. त्या भागातील कोणते डास पकडून पाठवावे, या विषयी आरोग्य विभागात एकच चर्चा आहे.