आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Deokar's Bail Cancelled, Ncp Seeks His Resignation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव घरकुल घोटाळा : देवकरांची अटक अटळ; हायकोर्टात जामीन रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई:बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी गुलाबराव देवकर यांच्या अटकेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. यामुळे देवकरांना ताप्तुरता दिलासा मिळाला असून त्यांची अटक टळली आहे. मात्र देवकरांचा परिवहन राज्यमंत्रीपदाचा राजीनामा ‍स्वीकारल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी दिली आहे.
देवकरांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवला असल्याचेही पिचड यांनी सांगितले आहे.
आता गुलाबराव देवकरांच्या जामिनावरील सुनावणी येत्या 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.
जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तेथे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र याप्रकरणी त्यांचे मंत्रीपद गेल्यात जमा झाले आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी देवकरांचा जामीन रद्द करून त्यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले होते. घरकूल घोटाळ्यातील आरोपी देवकर 21 मे रोजी जळगाव पोलिसांना शरण आले होते. तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जळगाव जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्यांची लगेच सुटकाही झाली होती.
दरम्यान, देवकरांना अटक अटळ असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते.
गेल्या 21 मे रोजी देवकर यांना घरकुल प्रकरणात अटक करण्यात आली होती. जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. क्षीरसागर यांनी त्यांना जामीन मंजूर केला होता. या निकालाविरुद्ध प्रेमानंद जाधव व इतरांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी देवकरांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. देवकरांशी त्याबाबत फोनवरून चर्चा केल्याचे ते म्हणाले. देवकर आरोपी असलेल्या घरकुल घोटाळ्याची जळगाव पोलिसांनी जानेवारी 2012 पासून चौकशी सुरू केली आहे. शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांना या प्रकरणात आधीच अटक करण्यात आली असून उच्च न्यायालयाने आधीच त्यांचा जामीनअर्ज फेटाळून लावला आहे.
वकिलांचा युक्तिवाद - विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तिवाद करताना जिल्हा न्यायालयाने कशाच्या आधारे जामीन दिला हे प्रथमदर्शनी स्पष्ट होत नसल्याचे सांगितले. जामीन देताना कुठलेही कारण दिलेले नाही. आरोपी देवकरांविरुद्ध सरकार पक्षाने काय पुरावे सादर केले हे आणि त्यांच्यांविरुद्ध गुन्हे असल्याचेही नमूद करण्यात आलेले नाही. याच घोटाळ्यातील तिघा आरोपींचा जामीन खंडपीठाने नाकारला,याकडे चव्हाण यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले. देवकर यांचे वकील अनिकेत निकम यांनी खंडपीठाच्या आदेशास सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यासाठी स्थगिती मागितली. मात्र खंडपीठाने नकार दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अँड. शैलेश ब्ब्रह्मे होते.
अटक व राजीनामानाट्य - घरकुल घोटाळा प्रकरणी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना पोलिसांनी 19 मे रोजी चौकशीसाठी दुसर्‍यांदा बोलविले होते, परंतु आपली प्रकृती बरी नसल्याची तार पाठवून त्यांनी त्या दिवशी अटक टाळली. त्यानंतर पुन्हा 21 मे रोजी त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले. चौकशी झाल्यावर तत्काळ त्यांना अटक करण्यात आली. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना 30 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. देवकर यांनी जामिनासाठी ताबडतोब अर्ज दाखल केला असता 50 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका झाली. देवकर यांना जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला नाही.
घोटाळा नेमका काय? - 1996मध्ये तत्कालीन जळगाव नगरपरिषदेने स्वस्तात घरे देण्याची योजना आखली. पालिकेच्या ताब्यात जागा नसताना घरकुलांचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यावेळी देवकर नगराध्यक्ष होते. त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. खान्देश बिल्डरला कंत्राट देण्यात आले होते. ही योजना अध्र्यावरच रखडली. 3 फेब्रुवारी 2006 रोजी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या फिर्यादीवरून 29 कोटींच्या घोटाळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात माजी मंत्री आमदार सुरेश जैन यांच्यासह माजी महापौर, नगरसेवक प्रदीप रायसोनी, खान्देश बिल्डर्सचे संचालक राजा मयूर आणि नाना वाणी हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी अटकेत आहेत.
राष्ट्रवादीनेच केली होती पाठराखण!
* घरकुल प्रकरणात देवकर आरोपी असल्यामुळे त्यांची 3 फेब्रुवारी रोजी चौकशी झाली आणि 21 मे रोजी त्यांना अटक झाली. तेव्हापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.
* देवकर यांना पोलिसांनी अटक केली असली तरी न्यायालयाने काही तासांतच त्यांची जामिनावर मुक्तता केल्याचे सांगत पक्षाने त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवले.
* पहिल्या टप्प्यात अटक झालेल्या आरोपींपैकी ज्यांच्यावर आधीचेही गुन्हे होते त्यांना न्यायालयाने जामीन नाकारला होता. दुसर्‍या टप्प्यात अटक झाली.
* आधीचे गुन्हे असताना आणि तपास अधिकार्‍यांची कोठडीची मागणी असताना न्यायालयाने देवकर यांना जामीन दिला होता. तोच आता खंडपीठात रद्द करण्यात आला.
भाजपला हवाय गुलाबराव देवकर यांचा राजीनामा
सुरेश जैन हेच घरकुल घोटाळ्यातील मुख्य गुन्हेगार - गुलाबराव देवकर
जळगावच्या महिलांनी वाचला देवकर यांच्या तक्रारींचा पाढा