आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Department Of Medicine, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

42 मेडिकलवर मिळणार "टॅमी फ्लू', अन्न व औषध विभागाकडे करावा लागेल अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरात अतिसार, टायफॉइड, मलेरियासह साथीच्या आजारांसोबतच स्वाइन फ्लूचीही भीती निर्माण झाली आहे. चाळीसगाव येथील एका तरुणाचा या आजारामुळे दोन दिवसांपूर्वी बळी गेला आहे. त्यानंतर प्रशासन जागे झाले असून स्वाइन फ्लूच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या टॅमी फ्लूच्या गोळ्या विक्रीचा परवाना शहरातील ४२ मेडिकलधारकांना देण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त बी.पी. पाटील यांनी ह्यदिव्य मराठीह्णशी बोलताना दिली आहे.
गेल्या एक महिन्यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे टॅमी फ्लूच्या गोळ्या विकण्यासाठी किती मेडिकला परवाने दिले आहेत, याची माहिती मागितली होती; मात्र ती अद्यापही मिळालेली नाही.
आज देणार यादी
जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे टॅमी फ्लू गोळ्याविक्रीचा परवाना असलेल्या मेडिकल स्टोअर्सची माहिती पाठवण्याचे पत्र अन्न व औषध प्रशासन विभागाला एक महिन्यापूर्वी देण्यात आले होते. ती यादी मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सकांना देणार असल्याचेही पाटील यांनी या वेळी सांगितले.
पत्र देऊन झाला महिना
जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे अन्न व औषध प्रशासन विभागाला टॅमी फ्लूच्या गोळ्या विक्रीसंदर्भात माहिती देण्याविषयी एक महिन्यापूर्वीच पत्र देण्यात आले होते. मात्र, अद्याप त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. डॉ. आर.के. शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक
मेडिकलचालकांनी अर्ज करावे
स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी लागणा-या टॅमी फ्लूच्या गोळ्या विकण्याची परवानगी घेण्यासाठी मेडिकल स्टोअर्सचालकांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे अर्ज करावा. मात्र, दुकान जुने असण्याची अट आहे. बी.पी.पाटील, सहायक आयुक्त, एफडीए