आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेब्रुवारीत जळगावात विभागीय पक्षिमित्र संमेलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात २७ २८ फेब्रुवारीदरम्यान वाघूर धरण परिसरात पहिले उत्तर महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन आयोजित करण्यात येणार अाहे. या संमेलनाच्या अायाेजनासंदर्भात शनिवारी सातपुडा बचाव कृती समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात अाला. या संमेलनासाठी ‘पक्ष्यांवरील संकट, अधिवास विध्वंस’ ही मध्यवर्ती संकल्पना ठरवण्यात अाल्याची माहिती सातपुडा बचाव कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र नन्नवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाघूर धरण परिसरात अायाेजित करण्यात येणाऱ्या या संमेलनात पक्षीसंवर्धनापुढील आव्हाने, उत्तर महाराष्ट्रातील पक्षी प्रजाती स्थलांतरित पक्षी, व्याघ्रसंवर्धन संचारमार्ग, जैवविविधता कायदा अन् वारसास्थळे, सातपुड्यातील जैवविविधता, वाघूर धरण परिसरातील जैवाविविधता अाणि पक्षी अधिवास या विषयांनुसार पक्षी अभ्यासक सादरीकरण करणार अाहेत.
संमेलनाच्या सूत्रबद्ध आयोजनाच्या दृष्टिकोनातून सातपुडा बचाव कृती समितीमधील संस्थेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची संयोजन समिती गठीत करण्यात आली आहे. या संमेलनाचे निमंत्रक म्हणून गणेश सोनार सहनिमंत्रक म्हणून राहुल सोनावणे यांची निवड झाली आहे. तसेच समन्वयक म्हणून अनिल महाजन (वरणगाव), सहसमन्वयक- अाश्विन पाटील (अमळनेर), संयोजक- राजेंद्र नन्नवरे, सहसंयोजक- अर्चना उजागरे, महाव्यवस्थाप्रमुख- रवींद्र सोनवणे, सहव्यवस्थाप्रमुख- सुरेंद्र चौधरी (भुसावळ) वासुदेव वाढे यांची निवड करण्यात आली आहे. नोंदणी कार्यालयप्रमुख म्हणून इमरान तडवी उदय चौधरी, तर प्रचार-प्रसिद्धीची जबाबदारी बाळकृष्ण देवरे आणि शैलेंद्र महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विभागीय संचालन समितीचे प्रमुख म्हणून विनोद पाटील (नाशिक) यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत अनिल माळी (नाशिक), डॉ.पी.एम.व्यवहारे (धुळे), अभय उजागरे (जळगाव), जितेंद्र वाणी (अमळनेर), विक्रम पाटील (पिंपळगाव हरेश्वर), मिलिंद भारंबे (भुसावळ), केशर उपाध्ये (जळगाव) चेतना नन्नवरे (जळगाव) यांचा समावेश आहे.
शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संमेलनात स्वतंत्र कार्यशाळादेखील आयोजित केली आहे. अधिकाधिक विद्यार्थी, नागरिक, निसर्गप्रेमी आणि पक्षिमित्रांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे संयोजन समितीच्या वतीने कळवण्यात अाले अाहे.

पुढील अाठवड्यात अध्यक्षांची निवड
संमेलनासाठी सल्लागार समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. त्यात ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ साहित्यिक मारुती चितमपल्ली, भाऊ काटदरे, किशोर रिठे, सुधाकर कुऱ्हाडे, डॉ.राजू कासंबे, डॉ.जयंत वडतकर भिभास अमोणकर यांचा समावेश आहे. तसेच पुढील आठवड्यात संमेलनाच्या अध्यक्षांची निवड करण्यात येईल.