आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Deprived Of New Colonies Water Supply In Jalgaon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हंडामुक्त जळगाव, मागेल त्यास पाणी, वर्षानुवर्षे वंचित नवीन वसाहतींमध्ये जलवाहिन्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पिण्याच्या स्वच्छ पाण्यापासून वंचित असलेल्या शहर परिसरातील नवीन वसाहतींमध्ये आता मागेल त्याला पाणी मिळणार आहे. त्यासाठी आमदार निधीतून ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी ३५ लाखांच्या जलवाहिन्यांचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. या ३५ लाखांमधून शहरातील २० भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येणार असून, काही ठिकाणी पाणी पोहोचलेदेखील आहे.
महापालिकेच्या खराब आर्थिक परिस्थितीमुळे विकासकामे खाेळंबली आहेत. दुसरीकडे वाघूर धरणात मुबलक पाणी असूनही केवळ जलवाहिन्यांचे जाळे नसल्याने काही विस्तारित भागातील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत होती. नेमकी हीच बाब हेरून आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या निधीतून जळगाव शहर हंडामुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉलनी तेथे पाणी पोहोचवण्यासाठी ५० लाखांची कामे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यानुसार शहरातील २० भागांमध्ये पाइपलाइन टाकण्यासाठी ३५ लाख चार हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच काम सुरू होईल.
पाण्यासाठी पक्षभेद नाही
- प्रचारासाठी फिरताना शहरातील बऱ्याच भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची साेय नसल्याची बाब निदर्शनास आली. पालिकेच्या खराब आर्थिक परिस्थितीमुळे पाइपलाइन टाकण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे माझ्या आमदार फंडापैकी ५० लाख रुपये पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी खर्च करणार आहे. त्यातील काही कामे पूर्ण झाली असून, काही सुरू आहेत. या कामात कोणताही जातीभेद, राजकारण वा पक्षभेद ठेवणार नाही. ज्या भागातील नागरिकांना गरज आहे, त्यांची तहान भागवण्यास प्राधान्य देणार आहे.
सुरेश भोळे, आमदार
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कोणत्या भागात पोहोचणार पाणी...