आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेप्यूटी सीईओ लाच प्रकरण: पंचायतराज दौऱ्यासाठी जमवले साडेचार कोटी: आमदार अनिल गोटे यांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- पंचायतराज समिती सदस्यांना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांकडून सुमारे साडेचार काेटी रुपये जमा करण्यात अाल्याचा आरोप याच समितीचे सदस्य तथा अामदार अनिल गाेटे यांनी केला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना समिती सदस्य असलेले आमदार हेमंत पाटील यांना दीड लाख रुपयांची लाच देताना पकडण्यात आल्याने हा विषय चर्चेत आला आहे. 

पंचायत राज समिती तीन दिवसांच्या जिल्हा दाैऱ्यावर अाली हाेती. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडून पैसे जमा करण्यात आले. समितीच्या दाैऱ्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला चार महिन्यांपूर्वीच मिळाली हाेती. त्यानंतरही समितीच्या दौऱ्याची कोणतीही पूर्वतयारी केलेली नव्हती. तपासणीत चुका आढळल्यास समितीच्या सदस्यांनी कारवाई करू नये यासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा करण्यात आल्याची तक्रार अामदार अनिल गाेटे यांच्याकडे करण्यात अाली. या विषयी सर्किट हाऊस येथे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी अधिकाऱ्यांनी खर्चाचे प्रयाेजन असल्याचे सांगितले हाेते. मग प्रत्येकाकडून सात हजार रुपये जमा का केले असा प्रश्न विचारला असता सीईअाेंनी हा प्रकार आत्ताच समजल्याने चाैकशी करताे, असे सांगितले. त्यांना पैसे परत करण्यास सांगितले हाेते. 

संघटित गुन्हेगारीचा कट 
पैसेजमाकरण्यात तीन वरिष्ठ अधिकारी एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याचा समावेश अाहे. बैठकीवेळी एका कार्यालयात पैसे पाकिटात भरण्याचे काम सुरू हाेते. हा संघटित गुन्हेगारीचा कट अाहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांच्या मालमत्तेवर टाच अाणली जावी. मुख्यमंत्र्यांशी बाेलणार अाहाेत. 
- अामदार अनिल गाेटे, पीअारसी सदस्य 
बातम्या आणखी आहेत...