आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियुक्ती होऊनही जळगावात उपायुक्त हजर होईना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकल्प अधिकारी प्रदीप जगताप यांची महिनाभरापूर्वी जळगाव पालिकेच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे; मात्र वर्षभरानंतर पालिकेला उपायुक्त मिळाल्याचे समाधान अल्पकाळ राहिले आहे. कारण महिना उलटूनही नवीन उपायुक्त येण्याच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत.

अधिकारी येण्यास तयार नसलेल्या जळगाव महापालिकेत ऑगस्ट 2012मध्ये उपायुक्त साजिद पठाण यांची बदली झाली होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील अधिकार्‍यांच्या झालेल्या बदल्यांच्या यादीत 2010च्या बॅचमधून शासकीय सेवेत रुजू झालेले व सध्या बीड येथे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या प्रदीप जगताप यांची जळगाव पालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती झाली होती; मात्र महिना उलटला तरी जगताप रुजू झालेले नाहीत. ऐन निवडणुकीच्या काळात एकमेव उपायुक्त असलेले भालचंद्र बेहेरे यांची बदली झाल्याने प्रभाग अधिकारीपद असलेले सहायक आयुक्त अविनाश गांगुर्डे यांच्याकडे उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कारवाईचा धाक
सत्ताधार्‍यांना अडचणीचे ठरणार्‍या अधिकार्‍यांवर अविश्वास ठरावाचे अस्त्र उगारण्यात येते. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना या प्रसंगाला सामोरे जावे लागले होते.

पदाधिकार्‍यांचा विरोध
पालिकेत बदली झालेल्या नगररचनाकार लता इंगळे यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेतल्यास निवडणूक प्रक्रियेवर याचा प्रभाव पडू शकतो. असा आक्षेप भाजप गटनेते सुरेश भोळे यांनी घेतला आहे. पदाधिकार्‍यांकडूनच नवीन अधिकार्‍यांना विरोध होत असल्याची स्थिती आहे.

2010 च्या बॅचमधील नवीन उपायुक्त प्रदीप जगताप

2012 च्या ऑगस्टमध्ये उपायुक्त साजिद पठाण यांची बदली