आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुल्या जागांचे भवितव्य सर्वपक्षीय समितीकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेने वितरित केलेल्या ३९३ खुल्या जागांचा ठराव रद्द करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव महासभेने सर्वानुमते रद्द केला. याबाबत निर्णय घेण्यासाठी आता सर्वपक्षीय समिती तयार करण्यात येणार आहे. वाटप केलेल्या जागांचा वापर, शर्तभंग, वर्गवारीचे काम समिती करणार आहे. त्यामुळे प्रशासनाची या प्रकरणातील भूमिका आता संपली असून जागांचे भवितव्य पुन्हा लोकप्रतिनिधी ठरवतील.
उपमहापौर सुनील महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तीन तास चाललेल्या महासभेत पालिकेने आतापर्यंत वितरित केलेल्या खुल्या जागांचा विषय प्रमुख चर्चेचा ठरला. ३९३ जागांचा ठराव रद्दसाठी प्रशासनाकडून प्रस्ताव सादर केला होता. सुरुवातीलाच खाविआचे गटनेते नितीन बरडे यांनी प्रस्ताव रद्द करण्याची घोषणा केली. भाजपचे गटनेते डॉ. अश्विन सोनवणे यांनी त्याला दुजोरा दिला. मनसेचे अनंत जाेशी यांनी तर यासंदर्भात प्रशासनालाच टिकेचे लक्ष केले. ठराव रद्दला विरोध कायम होता. यातून मार्ग काढण्यासाठी रमेश जैन यांनी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्याची सूचना मांडली. त्याला सर्वांनी एकमताने सहमती दर्शवली. आता ही समिती खुल्या जागांबाबत काय त निर्णय घेईल. कैलास साेनवणे, अश्विनी देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केले.
‘दिव्य मराठी’ महासभेत
नागरीसुविधांसंदर्भात ‘दिव्य मराठी’चे ‘प्रभाग बोलू लागले’ हे अभियान सुरू आहे. यात प्रभागातील वस्तुनिष्ठ माहिती दिली जात असून मनपाचे अनेक भूखंड कचऱ्याचे आगार झाले आहेत. याबाबत छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले होते. याच वृत्ताचा संदर्भ देत सभागृह नेते रमेश जैन यांनी ‘दिव्य मराठी’चा अंक महासभेत दाखवला.
बातम्या आणखी आहेत...