आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deputy Municipal Commissioner Get Out Dhule Municipal Meeting

धुळे मनपाच्या भरसभेतून उपायुक्तांची हकालपट्टी, माेबाइल टाॅवरच्या विषयात वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - धुळे शहरातील ३६ मोबाइल टॉवर्सना परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून उपायुक्त डाॅ. प्रदीप पठारे यांना थेट कार्यमुक्त करण्याची त्यानंतर भरसभेतून हाकलून देण्याची घटना बुधवारी घडली. डाॅ. पठारेंविराेधात एकवटलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांचा पारा इतका चढला हाेता की, त्यांनी संबंधित अायुक्तांना कार्यमुक्त केल्यानंतर मिनिटभरही सभागृहात थांबू दिले नाही. महापालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरली.

मनपा सभेत उत्पन्न वाढीचे विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. त्यात शहरातील मोबाइल टॉवरधारकांकडून दंड त्यावरील व्याज वसुलीचा विषयही पत्रिकेवर होता. मोबाइल टॉवर प्रकरणात नगररचना विभागात सुरुवातीपासून अंदाधुंद कारभार सुरू होता. अनेक भागात अनधिकृत मोबाइल टॉवरची उभारणी सुरू असल्याचे प्रकार सुरू असल्याने नगरसेवकांनी हा विषय पटलावर येताच, नगररचना अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. नगररचनाकार सुरेश विसपुतेंना बोलावून शहरातील मोबाइल टॉवरची माहिती विचारली. त्यांनी १०९ मोबाइल टॉवर असून, एकालाही परवानगी नाही. त्यातील ३६ मोबाइल टॉवरधारकांना केवळ अटींवर ना-हरकत दाखला देण्यात आला असल्याचे सांगितले. तसेच यातील ४५ मोबाइल टॉवरधारकांकडून ५६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे; परंतु नगरसेवक सुभाष जगताप, संजय गुजराथी, गुलाब माळी, नंदू सोनार, नरेंद्र परदेशी, सोनल शिंदे यांच्यासह सभागृहातील नगरसेवकांनी नगररचना विभागात मनमानीपणे काम सुरू आहे. मोबाइल टॉवरची तक्रार केल्यावरही लक्ष देण्यात येत नसल्याने प्रभागात नगरसेवकांविषयी गैरसमज निर्माण होत असल्याचे मत मांडले. तर अधिकाऱ्यांचे काहीतरी संगनमत असल्याचा आरोप सुभाष जगताप यांनी केला. या वेळी त्या विभागाचे प्रमुख म्हणून उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी ३६ माेबाइल टॉवरला ना-हरकत दाखला दिला कसा, हे टॉवर ज्या इमारतींवर उभे आहेत त्यांच्याकडे बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, मालमत्ता कर भरल्याची तपासणी केली आहे का असा प्रश्न उपस्थित केला. त्यात तेही दोषी अाहेत. त्यामुळे त्यांच्याकडून त्या विभागाचे कामकाज काढून त्यांना बडतर्फे करण्याची मागणी नगरसेवकांनी करून महापौरांच्या डायससमोर गर्दी करून गदारोळ केला. या वेळी नंदू सोनार, गुलाब माळी, अमीन पटेल, नरेंद्र परदेशी, संजय परदेशी, कुमार डियालाणी, सय्यद साबीर अली मोतेबर, कैलास चौधरी, शरद वराडे यांच्यासह सभागृहातील सर्वांनीच मागणी केल्याने महापौर जयश्री अहिरराव यांनी तसा ठराव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

सभागृहात बसू देऊ नका
प्रदीपपठारे यांना नगरसेवकांनी कार्यमुक्त केले अाहे. यामुळे त्यांना सभागृहात बसू देऊ नका, अशी मागणी नगरसेवकांनी केली. सभागृहाबाहेर गेल्याशिवाय कामकाज हाेणार नसल्याची भूमिका घेत त्यांची सभागृहातून अक्षरश: हकालपट्टी केली आहे. त्यानंतर पठारे यांना बाहेर काढण्यात अाले.