आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपप्रादेशिकचे वाहन निरीक्षक अटकेत, नवापूर चेकपोस्टवर घेतली लाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर - जळगावच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षकला ६०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई नवापूर चेकपोस्ट नाक्यावर मंगळवारी रात्री करण्यात आली. नवापूर येथील चेकपोस्ट नाक्यावर वाहनांची कागदपत्रे पूर्ण असतानादेखील चालकांकडून ६०० रुपयांची मागणी केली जाते, अशा तक्रारी वारंवार केल्या जात होत्या.
दरम्यान, जामनगर ते गुजरात येथून हैदराबाद- चेन्नई रोडवर टाइल्स रिलायन्स प्लास्टिक दाण्यांची वाहतूक करतात. या नाक्यावर ट्रकचालकांकडून ‘एन्ट्री’ म्हणून पैशांची मागणी केली जाते, अशी तक्रार या तक्रारदार चालकाने जळगाव येथील अँटी करप्शन ब्यूरो कार्यालयात केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक डी.डी.गवारे यांच्या पथकाने नवापूर येथील चेकपोस्टवर मंगळवारी रात्री सापळा रचला. यात मोटार वाहन निरीक्षक हेमंत गोविंद हेमाडे यांना ६०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधात नवापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या ठिकाणी संशयितरित्या एक बॅगही अाढळून आल्याने खळबळ उडाली आहे.