आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैनच्या सौर वॉटर फिल्टरला ‘डेसल प्राइज’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जैन सौर वॉटर फिल्टरला जागतिक पातळीवरच्या ‘डेसल प्राइज’ने गौरवण्यात आले. दीड लाख डाॅलरचा (जवळपास ९५ लाख रुपये) हा पुरस्कार अाहे. या जलशुद्धीकरण युनिटसाठी जैन इरिगेशन आणि अमेरिकेतील एमआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन सुरू होते. अमेरिकेतील यूएसएडमार्फत घेतलेल्या स्पर्धेसाठी २९ देशांतील ६८ प्रवेशिका प्राप्त झाल्या हाेत्या. त्यातील अंतिम प्रवेशिकेतून जैन वाॅटर फिल्टर प्रथम अाले. संशोधनाच्या टीममध्ये आर. बी. जैन, अभिषेक निरखे, संशोधक नताशा राइट, डॉ. प्रोफेसर अॅमोस विंटर यांचा समावेश होता.

दहा हजार लिटर शुद्ध पाणी
जैनइरिगेशनने विकसित केलेल्या तंत्रज्ञानात दिवसाला १० हजार लिटर शुद्ध पाणी मिळेल, या क्षमतेचे फिल्टर तेथे लावण्यात आले होते. या फिल्टरमधून भूगर्भातील हजार टीडीएस प्रदूषित पाणी इलेक्ट्रोडायलेसिस रिव्हर्सल तंत्राप्रमाणे एकाच फेरीत यूव्हीसह शुद्ध करून दाखवले. प्रती मिनिटाला याची क्षमता ३० लिटर अाहे. हे संपूर्ण युनिट केवळ सौर ऊर्जेच्या साहाय्याने कार्यक्षमपणे चालवला गेला. यात केवळ ते १० टक्केच पाणी वेस्ट स्वरुपात बाहेर पडते.हे वेस्ट पाणी निसर्गपूरक ठेवण्यातही या तंत्रज्ञानाला यश मिळाले. जैन इरिगेशन एमआयटीच्या संयुक्त विद्यमानाने विकसित करण्यात आलेले सौरऊर्जेवरील वॉटर फिल्टर.

गेल्या वर्षांत केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हा पुरस्कार मिळाला अाहे. या पुरस्कारामुळे आम्हा सर्वांना प्रोत्साहन मिळाले आहे. हा पहिलाच टप्पा असून, यापुढे असे प्रकल्प व्यावसायिक तत्त्वावर प्रत्येक ग्रामपंचायतीत सुरू करण्यात येईल. या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शहरी ग्रामीण भागात व्हावा, असे वाटते. -भवरलालजैन, अध्यक्ष,जैन उद्याेगसमूह