आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Designer Luke News In Marathi, Designer Luke's Hair Klacar, Divya Marathi

हेअर क्लचरलाही आता डिझायनर लूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- फॅशनच्या दुनियेत डिझायनर लूकला अधिक महत्त्व दिले जाते. त्यानुसारच प्रत्येक गोष्टीत काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्नही डिझाइनर करतात. कपडे, चप्पल, दागिने, पर्स याप्रमाणेच डिझाइनर पिन्सही बाजारात दाखल झाल्या आहेत. तरुणींची आवडती गोष्ट असणारे डोक्याला लावणारे क्लचरमध्येही डिझाइनर पॅटर्न पाहायला मिळत आहे. राहणीमान आणि स्टाइलनुसार या क्लचरची निवड केली जाते. तरुणींच्या सजण्यातील सगळ्यात महत्त्वाचा हा भाग असतो. खरेदीच्या यादीतील पहिला क्रमांक क्लचरचाच सध्या लागतो. केसांना वेगवेगळ्या आकारात सजवण्यासाठी तसेच फॅशनेबल हेअर स्टाइल व लूक मिळवण्याकरिता याचा वापर तरुणी करतात. महाविद्यालयीन तरुणींमध्ये याची फॅशन अधिक दिसते.

कपड्यांच्या रंगांप्रमाणे खास करून क्लचर वापरण्यात येते. नेट, जॉर्जेटसारख्या रंगीबेरंगी फुलांच्या, सिल्की मटेरीयलमध्ये हे क्लचर बाजारात आहेत. ठिपक्यांचे, डिझाइन असणारे भडक रंगांना अधिक पसंती मिळत आहे.

डिझायनर पॅटर्न
मोती, लटकण, घुंगरू, डोर, वर्क, स्टोन, काच यापासून डिझाइनर लूक या पिन्सला दिले गेले आहे. तसेच नेटमुळे अधिक खुलून दिसते. सर्व रंगांमध्ये या पिन्स बाजारात पाहायला मिळतात. 5 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत क्लचर विक्रीस आहेत

फुलपाखरूची क्रेझ
फुलपाखरूच्या आकाराचे असलेले क्लचर पाहायला मिळतात. यात बनाना क्लिपही प्रचलित आहेत. फुलपाखरूच्या आकारासारखे कापडाच्या मटेरीयलमध्ये त्यास सजवलेले असते. त्याचप्रमाणे सात रंगांमध्येही उपलब्ध असते. फुलपाखरूच्या आकाराच्या पिन्सची तरुणींमध्ये क्रेझ आहे.