आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Designer Rama Jadhav Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमी किमतीचे, साधे; पण शोभणारे ड्रेसदेखील‘डिझायनर’- रमा माधव’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कपड्यांमधील बटबटीतपणा ही फॅशन नव्हे. कमी किमतीतील आपल्याला शोभेल असा ड्रेस तयार केल्यास तोदेखील डिझायनर ड्रेस होतो. साधे पण छान कसे दिसेल, त्यात क्रिएटिव्ह कसे करता येईल आणि तुम्ही कशाप्रकारे आत्मविश्वासाने त्याला परिधान करतात यावर फॅशन अवलंबून असते, असे मत ‘रमा माधव’ या चित्रपटाच्या कॉस्च्युम डिझायनर पौर्णिमा ओक यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले. शहरातील संस्कृती या कापड दुकानाच्या उदघाटनासाठी त्या शहरात आल्या होत्या. आतापर्यंत नटी, बालगंधर्व, राजमाता जिजाऊ यासारखे ५२ मराठी, हिंदी इंग्रजी चित्रपटांना त्यांनी डिझाइन केले आहे.

चित्रपटात डिझाइन करताना फक्त व्यक्तिरेखेप्रमाणे कपडे बनवले, असे नाही तर त्याचे शेड कार्ड बनवले जाते. कथा कोणती, व्यक्तिरेखा काय आहे, तिचे वय, तीन प्रकारच्या रमा दाखवतानाचा फरक, तिचा अभ्यास, त्यांच्या स्वभावानुसार तिला काय चांगले दिसेल, शूटिंग करणारा त्याचे बॅकग्राऊंड काय असणार, रमा-माधवच्या वेळेस वाड्यांच्या भिंतीचा रंग कोणता, आर्टिस्ट कोण आहे, रंग कसा आहे, मेकअप कसा असेल हे पहावे लागते. त्याचबरोबर मेकअप, हेअर, आर्ट, साडी यांचा ताळमेळ साधावा लागतो. सिंधुताई सपकाळ करताना खूप मेहनत घ्यावी लागली. एकाच रंगाच्या १० साड्या घेतल्या. त्यांच्या एका साडीवरील प्रवास खूप मोठा होता. त्यामुळे त्या घरातून बाहेर निघतात ते साडीला डाग लागण्यापासून ते साडीचे ठिगळ हाेईपर्यंत दाखवावे लागले. गरिबी दाखवण्यासाठी नवीन कपड्याला धुऊन, आपटून, उन्हात सुकवून, चहाच्या पाण्यात टाकून, छिद्रे पाडून, खिसे बळजबरी उसवून, मळवून खराब करावे लागते.
स्वत:चेडिझाइन करा
फॅशनडिझाइनरच्या विद्यार्थ्यांनी व्हिज्युअल करावे. आसपासच्या गोष्टी पाहत रहाव्यात. स्वत:चे कपडे शिवण्यापेक्षा मैत्रिणीचे शिवा. फॅब्रिकच्या टेक्चरचा अभ्यास करावा. गुगलवर शोधू नका आपणहून क्रिएट करा.