आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात स्फोटकांचा साठा, गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- शहरातील अमित आणि राज हार्डवेअरमध्ये विनापरवानगी कॅल्शिअम कार्बाइड या स्फोटकाचा साठा केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. न्यायाधीश अमित खारकर यांनी दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कॅल्शिअम कार्बाइडचा साठा केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक सतीश देशमुख, एलसीबीचे सहायक निरीक्षक किरण शिंदे यांनी सोमवारी अमित आणि राज हार्डवेअरमध्ये छापा टाकला. या वेळी दुकानात 200 किलो स्फोटकांचा साठा आढळला होता. यानंतर दुकानमालक नारायणदास मेघानी आणि सफर सफागमचंदानी यांच्याकडे परवान्याबाबत विचारणा केली. त्यांनी नकार देताच हवालदार दीपक शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल झाला. न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश खारकर यांनी आरोपींना 11 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. सहायक पोलिस निरीक्षक पी.बी.भोंडवे तपास करीत आहे.