आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पांझरा नदीपात्रात तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे -  शहरातील पांझरा नदीपात्रात मुख्यमंत्र्यांची पहिल्यांदाच सभा हाेणार अाहे. त्यासाठी तयारी सुरू अाहे. बुधवारी (दि.१७) मुख्यमंत्री विविध विकास कामांचे उद‌्घाटन करणार अाहेत. रिमोट कंट्रोलद्वारे हे उद‌्घाटन हाेईल. मात्र, नदीपात्रातील सभा हेच शहरवासीयांसाठी अाकर्षण राहणार अाहे. 
 
शहरात अातापर्यंत मुख्यमंत्री अथवा मान्यवरांच्या सभा माेठ्या मैदानावर झाल्या. मात्र, पांझरा नदीपात्रात प्रथमच सभेचा उपक्रम हाेणार अाहे. यावर अामदार अनिल गाेटे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, शहरातील पांझरा नदीच्या पात्रात मुख्यमंत्र्यांची सभा हाेईल. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक, सांस्कृतिक भवनाचे उद‌्घाटन हाेईल. त्यानंतर सभास्थळावरून रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या व्यावसायिकांचे पुनर्वसन, पारोळा रोड पोलिस चौकी, पांझरा नदीवरील पाइप मोरी या कामांचे लोकार्पण हाेईल. ७५ कोटी १६ लाख रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना, बाजार समिती ते तंत्रनिकेतनपर्यंत दोन किलाेमीटर लांबीचा रस्ता, पांझरा नदीवरील १२ फूट उंचीच्या बंधाऱ्याचे काम, जेल रोडवरील विस्थापितांचे पुनर्वसन कामाचे भूमिपूजन हाेईल. रावेर सर्व्हे नंबर ८०चे ६४३ हेक्टर जमिनीचे एमआयडीसीकडे हस्तांतर केले जाईल. कार्यक्रमाला समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त नदीपात्रात सफाई हाेत अाहे. पत्रपरिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल, सुनील नेरकर, प्रतिभा चौधरी, हिरामण गवळी, तेजस गोटे, भारती माळी उपस्थित होते. 

यांचा हाेईल सत्कार 
जनसंघाच्याविचारांसाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा या वेळी सपत्नीक सत्कार हाेणार येणार आहे. त्यात लखन भतवाल, सुधाकर पावसकर, मदनलाल मिश्रा, यादवराव पाटील, पांडुरंग पवार, डॉ. विवेकानंद चितळे, डॉ. सावजी, सुभाष शर्मा, माधवराव बापट, धरमचंद चोरडिया, साेमनाथ जोशी, प्रा.रवी बेलपाठक यांचा समावेश अाहे. 
बातम्या आणखी आहेत...