आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धरणगाव पोलिसांच्या मध्यस्थीने ‘त्या’ दोघींना केले विभक्त!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरणगाव - प्रेमाने जात,समाज,श्रेष्ठ-कनिष्ठ या सीमा कधीच ओलांडल्या आहेत. आता समलिंगी संबंधांचे आकर्षण असलेल्यांनी नैसर्गिक बंधनेही तोडली आहेत. याचाच प्रत्यय धरणगाव पोलिस ठाण्यात दोन युवतींच्या कथित संबंधाची तक्रार थेट पालकांनीच दाखल केल्यामुळे आला आहे. वारंवारची भेट आणि ओळखीतून संबंध प्रस्थापित झाल्यामुळे एक युवती, दुसरीला पळवून नेण्यासाठी येथील बसस्थानकावर आली होती. जागृत पालकांनी तत्काळ पोलिसांची मदत घेऊन हा प्रकार हाणून पाडला.

त्याचे असे झाले की, धरणगाव तालुक्याच्या एका गावातील युवती मोहिनी आणि अमळनेर तालुक्यातील युवती रागिनी (नाव, गाव बदलले आहे) या दोन्हींची बसमध्ये प्रवासात ओळख झाली. रागिनी ही 22 वर्षांची असून तिला एक मुलगा आहे. दोन वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला आहे तर मोहिनी ही साडेसतरा वर्षांची आहे. दोघींच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्या दोघींमध्ये समलिंगी संबंध प्रस्थापित झाले. दोन्ही एकत्रित राहू लागल्या. साधारण या दोन्ही युवती दोन महिने एकत्रित राहिल्या आणि त्यांनी लग्न केल्याचा दावा केला आहे. कायदा आणि निसर्ग या दोन्हींच्या विरोधातील ही कृती आहे. त्यामुळे या प्रकाराला विरोध होणे साहजिक आहे.


काही दिवस सोबत राहिल्यानंतर गावी आलेल्या मोहिनीस घेण्यासाठी रागिणी धरणगाव बसस्थानकावर आली होती. हा प्रकार मोहिनीच्या आई, वडीलांना कळला. त्यानंतर त्यांनी दोन्ही तरुणींना घेऊन धरणगाव पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक एम.जी. बनकर यांच्यासमोर उभे केले. तेथेही या दोघींनी आम्ही लग्न केले आहे, आम्हाला एकत्रित राहू द्या, म्हणून पोलिसांकडे आग्रह धरला. आम्हाला एकत्रित राहू न दिल्यास आम्ही रेल्वेखाली जीव देऊ म्हणून धमकीही दिली.