आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यातील अजिंक्यच्या प्रकल्पास नासाचे द्वितीय पारिताेषिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - इलेक्ट्रो‑हायड्रोजन पद्धतीने अंतराळात पाणी तयार करता येईल. गुरुत्वाकर्षण कसे कमी करता येईल. घरगुती साहित्याची ने‑आण करताना रॉकेटचा वापर करता येईल, अशा अंतराळात वसाहत करण्यासाठी पूरक ठरणाऱ्या बाबींचा अजिंक्य नाईक याने केलेल्या प्रकल्पास अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने द्वितीय क्रमांकासाठी निवड केली आहे. या स्पर्धेत चार हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले हाेते.

धुळे येथील नाॅर्थ पाइंट स्कूलमध्ये नववीत शिक्षण घेणाऱ्या अजिंक्य जयंत नाईक याने नासाच्या ‘द स्पेश काॅलनी’ या स्पर्धेत सहभाग घेतला हाेता. वाढत्या लाेकसंख्येमुळे पृथ्वीवर कमी हाेत चाललेली जागेची उपलब्धता, यामुळे अंतराळात वसाहती हाेऊ शकतात? या वसाहती झाल्या तर त्यांना नेमके काय लागेल? त्या कशा विकसित हाेतील? यावर अजिंक्यने एक प्रकल्प करून जानेवारीत नासाकडे सादर केला. अजिंक्यचे वडील जयंत नाईक हे दूरसंचार विभागात माेबाइल सेवेत कार्यरत अाहेत. त्याला अाई रूपालीचे मार्गदर्शन मिळाले. या स्पर्धेत यश मिळवलेला अजिंक्य हा उत्तर महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी अाहे.

चार हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
नासाला स्पर्धेसाठी ९९६ प्रवेशिका हजार १७ विद्यार्थ्यांनी पाठविल्या. भारत, चीन, जपान, अमेरिकेसह २३ देशांतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.

सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा
नासाची‘स्पेस सेटलमेंट काॅन्टेस-२०१६’ही स्पर्धा सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हाेती. त्यात प्रकल्प घेऊन त्यावर प्रबंध तयार करावा लागताे. पाच ते सहा महिने हे काम चालते. त्यानंतर जानेवारी महिन्यात त्याची काॅपी नासाने ई-मेलवर पाठवावी लागते. तसेच हार्ड काॅपी सीडी, डिव्हिडीच्या मार्फत अमेिरकेतील नासाच्या कार्यालयात पाठवावी लागते.

काय अाहे अजिंक्यचा प्राेजेक्ट ?
अंतराळातीलघर ही संकल्पना अजिंक्यने प्रकल्पात राबवली. अंतराळात वसाहती कशा तयार केल्या जाऊ शकतात, अंतराळात इमारती बनवताना कशाचा वापर करावा, गुरुत्वाकर्षणाचा सामना कसा करावा लागेल, झाडे प्राणिमात्रांचा सहवास कसा राहील, पाणी कसे तयार केले जाईल? यातून मानवाला पाेषक वातावरण कसे असेल, यावर माहिती दिली अाहे. शेती, ऊर्जानिर्मिती, हाॅटेल्स, भविष्यातील विस्तार धाेके याचाही त्यात विचार करण्यात अाला अाहे. पृ‌थ्वीवरून अंतराळात जाण्यासाठी असणारी साधने सामान वाहून नेण्यासाठी राॅकेटचा कसा वापर करता येईल, यासंदर्भातील माहिती अजिंक्यने अापल्या प्रकल्पात दिली अाहे.