आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात: भीषण अपघातात बसचे दोन तुकडे; 7 ठार, मृतांमध्‍ये धुळ्यातील 4 जण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - गुजरातमध्‍ये रविवारी रात्री एसटी बस आणि ट्रकमध्‍ये झालेल्‍या भीषण अपघातात 7 जण ठार झाले आहेत. या अपघातात धुळे जिल्‍ह्यातील शिरपूर येथील चार जणांचा समावेश असल्‍याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
गुजरातमधील भरूच जिल्‍ह्यात असलेल्‍या नेत्रंगजवळ रविवारी रात्री एक एसटी बस आणि ट्रकमध्‍ये हा भीषण अपघात झाला. अपघातात सात जण घटनास्थळावर ठार झाले आहेत. तर, 20 जण जखमी आहेत. जखमींना भरूच, बडोदा, सुरत राजपीपला येथील हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे. मृतांमध्‍ये धुळे जिल्‍ह्यातील शिरपूर येथील 4 जण आहेत.
असा झाला अपघात
- रविवारी रात्री एक बस आणि ट्रकमध्‍ये हा अपघात झाला आहे.
- MH 20 BL 2694 या क्रमांकाची बस शिरपूरवरून बडोदा येथे येत होती.
- दरम्‍याने नेत्रंगमधील कुलवाडी चौकात असलेल्‍या ट्रकला बसने धडक दिली.
- हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्‍ये बसची दोन तुकडे झाले.
- अपघातातील प्रवाशांच्‍या किंचाळ्या ऐकूण परिसरातील लोक घटनास्‍थळी पोहोचले.
- नागरिकांनी108 रूग्‍णवाहिका आणि पोलिसांना माहिती दिली.
- घटनास्‍थळावर तत्‍काळ मदतकार्याला सुरूवात झाली.
- रूग्‍णालयात नेत असतानाच 6 प्रवाशी दगावल्‍याची माहिती आहे.
- 20 जखमींमध्‍येही काही लोक गंभीर असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अपघाताची भीषण फोटो....