आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरअखेर शहर हगणदारीमुक्त करण्याचा महापालिकेचा संकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - स्वच्छता मोहिमेला नागरिकांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. स्वच्छतेतूनच समृद्धीचा मार्ग जातो, असे प्रतिपादन स्वच्छता अभियानाचे महापालिकेचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर विकास पाटील यांनी महापालिकेतर्फे स्वच्छता अभियानांतर्गत रविवारी झालेल्या कार्यक्रमात केले. या वेळी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शहरातील १९ प्रभाग हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली. संपूर्ण शहर िडसेंबरपर्यंत हगणदारीमुक्त करण्यात येणार आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत आठवडा राबवण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्यानुसार शहरात रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर पाचकंदील ते महात्मा गांधी पुतळा अशी स्वच्छता रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमानंतर महापालिकेच्या सभागृहात कार्यक्रम झाला. या वेळी १९ प्रभाग हगणदारीमुक्त करण्याची घोषणा झाली. कार्यक्रमाला महापौर कल्पना महाले, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, उपमहापौर उमेर अन्सारी आदी उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना विकास पाटील म्हणाले की, शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती असल्याचे दिसून येते. ही स्वच्छता मोहिमेसाठी समाधानाची बाब आहे. परदेशात गेल्यावर सर्वप्रथम तेथील स्वच्छता आपल्या नजरेस भरते. परदेशातील अनेक बाबींचे आपण अनुकरण करतो मग स्वच्छतेच्या बाबतीत अापण परदेशी नागरिकांचा आदर्श का घेत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. स्वच्छता राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. संत गाडगेबाबा यांनी कृतीतून स्वच्छतेचा संदेश दिला. जेथे स्वच्छता अाहे तेथेच सरस्वती लक्ष्मी वास करते. त्यामुळे प्रत्येकाने घरीदारी सर्वत्र स्वच्छता ठेवावी. घर, गल्ली, शहर स्वच्छ ठेवले तरच देश स्वच्छ होईल, असेही ते म्हणाले.

आयुक्त संगीता धायगुडे म्हणाल्या की, स्वच्छता ही चळवळ होणे आवश्यक आहे. स्वच्छता राखणे हे फक्त प्रशासनाचे काम नाही. हे एक टीमवर्क असल्याचे त्या म्हणाल्या. महापौर कल्पना महाले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात शहरातील १९ प्रभाग हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली.

तसेच डिसेंबरपर्यंत संपूर्ण शहर हगणदारीमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला. या वेळी हगणदारीमुक्त प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका त्या भागातील स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रभाग तेरा आदर्श
शहरातीलप्रभाग क्रमांक तेरामध्ये कचराकुंडीमुक्त प्रभाग ही संकल्पना राबवण्यात आली. या प्रभागातील सर्व कचराकुंड्या हटवण्यात अाल्या आहेत. नगरसेवक संजय गुजराथी शिव फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. नागरिकांचेही सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमात संजय गुजराथी शिव फाउंडेशनच्या सदस्यांचा विकास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

रॅलीत अनेकांनी नोंदवला सहभाग
स्वच्छमहाराष्ट्र अभियानांतर्गत रविवारी पाचकंदील येथे सकाळी वाजता स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर पाचकंदील ते महात्मा गांधी चौकापर्यंत स्वच्छता रॅली काढण्यात आली. रॅलीत विकास पाटील सहभागी झाले होते. त्याचबरोबर नगरसेवक, महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले होते. यानंतर महाविद्यालयाच्या आवारात एसएसव्हीपीएस तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता जनजागृतीवर पथनाट्य सादर केले.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शहरातून महापालिकेने काढलेल्या स्वच्छता रॅलीत सहभागी आयुक्त संगीता धायगुडे, स्वच्छता अभियानाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर विकास पाटील, महापौर कल्पना महालेंसह मान्यवर.
बातम्या आणखी आहेत...