आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2015 मध्ये हे होतील धुळे शहरात बद्दल, बदलेल चेहरा मोहरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या वर्षात धुळे शहराचे रूप बदलणार आहे. त्यादृष्टीने काही पावलं पडणार आहेत, हे नक्की. त्या संभाव्य बदलांवर त्यासाठी सुरू असलेल्या वाटचालीवर टाकलेला हा एक प्रकाशझोत.
शहरात होणाऱ्या वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पांझरा नदीच्या दोन्ही काठावर साडेपाच किलोमीटर लांब अंतराचे आणि ६० मीटर रुंद असलेले रस्ते यावर्षी उभारण्यात येतील. त्यासाठी १४ कोटी रुपयांची तरतूदही झालेली आहे. या दोन्ही रस्त्यांसाठी किमान ४६ कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी प्रारंभी सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे या दोन्ही विभागांनी योग्यरीत्या सर्व्हे करावा, त्यानंतर मोठे अतिक्रमणे काढली तर रस्त्यांचे काम सुरळीतपणे मार्गी लागेल. दोन्ही बाजूने निघणारे रस्ते शहराला वळसा घालून जाणाऱ्या महामार्गावर निघणार आहेत.