आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची दगडफेक, पाेलिसांचा लाठीमार; धुळ्यात माेर्चाला हिंसक वळण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - अक्कलपाडा प्रकल्पातील पाणी शेतीला मिळावे, यासाठी मंगळवारी धुळ्यात अांदाेलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यास जिल्हाधिकाऱ्याची टाळाटाळ केल्यामुळे संतप्त झालेल्या अांदाेलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अावारात शिरून तुफान दगडफेक केली. दगड व विटांच्या या हल्ल्यात कार्यालयाच्या ६० खिडक्यांची तावदाने फुटली. कार्यालयात दगड व विटांचा खच जमा झाला. अतिरिक्त पाेलिस अधीक्षकांनाही धक्काबुक्की झाल्याने पाेलिसांनी जमावावर लाठीमार केला. त्यामुळे अांदाेलक पळत सुटले. यातील काही महिलांसह सुमारे १५० जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.

संतप्त शेतकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत महसूल विभागाचे दाेन कर्मचारी व चार पाेलिस कर्मचारी जखमी झाले. या घटनेमुळे सरकारी कर्मचारी भयभीत झाले हाेते, तर रस्त्यावर दाेन तास तणावाचे वातावरण हाेते. पाेलिसांनी या परिसरातील रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पाेलिस अधीक्षक चैतन्या एस. यांनीही तातडीने घटनास्थळ गाठले. शेतकऱ्यांचे अांदाेलन सुमारे पाच तास सुरू हाेते. त्या वेळी त्यांनी अामदार कुणाल पाटील तसेच माजी अामदार शरद पाटील यांच्याविराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली.

अक्कलपाडा धरणाचे पाणी पांझरा नदीपात्रातून वाहून जात अाहे. हे पाणी डाव्या कालव्यातून शेतीसाठी द्यावे, ही मागणी घेऊन काही गावातील शेतकरी मंगळवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदोलन करत हाेते. त्यांनी मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही अात जाण्यापासून राेखले. काही वेळाने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे अाले. आंदोलकांनी त्यांच्या वाहनाला घेराव घातला.

दुष्काळामुळे उद्रेक
धुळे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ८० टक्के पाऊस झाला आहे. त्यात सर्वात कमी पाऊस धुळे तालुक्यात झाला आहे. खरिपाच्या सुरुवातीला पाऊस झाला. मात्र, नंतर पाऊस झाला नसल्यामुळे पिके पूर्णत: करपून नुकसान झाले. सलग तीन वर्षे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. त्यातच हक्काचे पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला.

माजी आमदाराची धूम
शेतकऱ्यांचे अांदाेलन सुरू असतांना मंगळवारी माजी अामदार शरद पाटील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी अाले. मात्र, शेतकऱ्यांचे अांदाेलन पाहून त्यांनी मुख्य दरवाजाने न जाता जुन्या प्रशासकीय संकुलातून जाणे पसंत केले. माजी अामदारांनी शेतकऱ्यांच्या अांदाेलनाला का टाळले, याचीच चर्चा हाेती.

नेतृत्व नसलेले अांदाेलन
अामदार कुणाल पाटील व माजी अामदार शरद पाटील यांच्यावर संताप व्यक्त करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या अांदाेलनाला काेणाचेही नेतृत्व नव्हते. दहा ते बारा गावांमधील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हे अांदाेलन उभारले हाेते, हे विशेष.
असा प्राेटाेकाॅल नाही
जिल्हाधिकारी म्हणून प्रत्येक मोर्चाला सामाेरे जाणे हा प्रोटोकॉल नाही. या मोर्चासाठी खाली गेलाे तर उद्यापासून प्रत्येक मोर्चासाठी खाली जावे लागेल. शिष्टमंडळाशी चर्चा करून गांधी जयंतीच्या दिवशी अक्कलपाड्यातून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी कार्यालयावर दगडफेक केली. पोलिसांनीही खूपच संयमाने घेतले आहे.
दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी धुळे
अाॅक्टाेबरमध्ये पाणी
अक्कलपाडा डावा कालवा ३२ किमीचा आहे. त्यापैकी ७५० मीटरचे काम अपूर्ण होते. ते सुरू झाले आहे. आतापर्यंत ५१० मीटरचे काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण होण्यासाठी तीन दिवस लागणार आहेत. टेस्टिंग करून पाणी साेडण्यासाठी पाच ते सहा दिवस लागणार आहेत. याची शेतकऱ्यांना कल्पना दिलेली आहे. २ ऑक्टोबर रोजी पाणी साेडले जाईल.
अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता, सिंचन विभाग, धुळे
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...