आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule Corporation Documentation Computerized Issue

दुर्लक्ष : धूळे महापालिकेत १०० वर्षांचे रेकॉर्ड जीर्णावस्थेत, संगणकीकरणाला फाटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - १००वर्षांपासून जपून ठेवलेल्या जन्म-मृत्यूचे लिखित रेकॉर्ड पुसट झाले आहे. तसेच वह्यांमधील नोंदी दिसत नसून, कागदांचे तुकडे होत आहेत. जीर्णावस्था झालेल्या रेकॉर्डची दुरुस्ती करणे कठीण होत असतानाही त्याचे संगणकीकरण होत नसल्याची स्थिती आहे.
परिणामी, कर्मचाऱ्यांना त्यावरील नोंदी काढून नागरिकांना दाखले देताना त्रास होत आहे. त्यामुळे हे रेकॉर्ड पूर्ण खराब होण्यापूर्वी त्याचे संगणकीकरण करणे आवश्यक आहे.
ज्यामधून या नोंदी घेतल्या जातात त्याच्या वह्या पुरत्या खराब झाल्या आहेत. त्यांची बांधणी खराब झाली असून, त्यातील कागदांचे तुकडे होत आहेत.
नोंदीही अस्पष्ट झालेल्या असून, या वह्या उघडणे आणि त्यावरून नावे शोधणे अतिशय कठीण काम झाले आहे. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना नोंदींचे रजिस्टर अतिशय सावधगिरीने हाताळावे लागतेय. या नोंदी आणखी खराब होण्यापूर्वी त्यांचे जतन होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचे संगणकीकरण डिजिटालायझेशन करायला हवे; अन्यथा हा महत्त्वाचा दस्तऐवज नष्ट होऊ शकतो. तसे झाल्यास नागरिकांना या नोंदी दाखल्यांपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.

१०० वर्षांच्या नोंदी...

महापालिका आणि तत्कालीन नगरपालिकेत साधारणत: १९०१ पासून अशा नोंदी ठेवण्यात येत आहेत. नगरपालिकेला १०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण झाला असून, त्या काळातील जुन्या नोंदींचे रेकॉर्डही उपलब्ध आहे. नागरिकांना दाखले लागल्यास दिनांक देऊन त्यावरून त्या वर्षातील नोंदी तपासून दाखले देण्यात येतात.

पहिल्या नोंदी मोडीलिपीत

महापालिकेला १५० वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे सुमारे १०० वर्षांच्या जन्म-मृत्यूच्या नोंदीही उपलब्ध आहेत. मात्र, या नोंदींचे रजिस्टर जीर्ण झाले आहे. त्यात सन १९१५पर्यंतच्या नोंदी मोडीलिपीत असून, त्या आजपर्यंत टिकून आहेत. मात्र, मजकूर कागदाची स्थिती पाहता त्यांचा फारसा उपयोग होईल असे दिसत नाही.