आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे दंगलीतील वीस संशयितांची जामिनावर सुटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - माधवपुरा परिसरात सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलीप्रकरणी 20 संशयितांना अटक झाली होती. त्या सर्वांना जामीन मंजूर झाला आहे.


शहरातील माधवपुरा परिसरात 6 जानेवारी रोजी दंगल उसळली होती. त्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सहा तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दंगलीचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दंगलीच्या दिवशी किशोर वाघ या संशयिताला तर टप्प्याटप्प्याने वीस जणांना अटक केली होती. त्यात सिद्धार्थ जयवंत अहिरे, संजय उर्फ सतपाल हिंमत अहिरराव, राकेश उर्फ मोत्या गोरख कढरे, महेश उर्फ छोटू सुरेश थोरात, पंकज उर्फ भुर्‍या गणेश सूर्यवंशी, शेख कलीम फकीर महंमद, रफिक उर्फ जंबुर्‍या सईद अहमद अन्सारी, जाकीर हुसेन मेहमूद अन्सारी, वाहीद शेख जब्बार खाटीक, जुबेर शेख नुरोद्दीन, सलमान अब्दुल हाफीज अन्सारी, वसिम रफिक अन्सारी, मेहमूद इस्माईल शहा, अस्लमखान अफजलखान पठाण, मोहसीन उर्फ मोया गिलाणी खाटीक, करीम नुर्‍या खाटीक, नितीन चंद्रकांत थोरात तर त्यानंतर प्रसाद उर्फ बाबा वसंतराव साळुंके, मिलिंद रवींद्र चौधरी यांचा समावेश होता. या सर्व संशयितांची धुळे न्यायालयाने जामिनावर मुक्तता केल्याची माहिती सीआयडीने दिली. दरम्यान, याप्रकरणी गेल्या महिन्यात 22 मे रोजी सीआयडीने एक हजार 50 पानांचे दोषारोपपत्र धुळे न्यायालयात दाखल केले आहे. त्यामध्ये 160 जणांचे जबाब नोंदवण्यात आले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच वाघ यांची जामिनावर मुक्तता झाली आहे.