आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे-नंदुरबार बँकेवर पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचाच झेंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - भाजपचे एक खासदार चार आमदार तर काॅंग्रेसच्या सात आमदारांनी एकमेकांविराेधात रणशिंग फुंकून प्रतिष्ठेच्या बनविलेल्या जिल्हा बँकेवर अखेर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा राेवला. काॅंग्रेस राष्ट्रवादीपुरस्कृत शेतकरी पॅनलला १६ जागांवर विजय मिळाला. भाजपला धुळे तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघाची एकमेव जागा राखता आली.

धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमधील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांवर असलेल्या प्राबल्यातून काॅंग्रेसच्या पॅनलने हा विजय मिळवला आहे. खासदार डाॅ. सुभाष भामरे आमदार जयकुमार रावल यांना दाेन्ही जिल्ह्यातून फारशी मते घेता आली नाही. गुरूवारी मतमोजणी सुरू होताच काही वेळाने भाजप पुरस्कृत पॅनलचा पराभव स्पष्ट झाला. जिल्हा बँकेत काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसपुरस्कृत शेतकरी पॅनलने १६ जागांवर विजय मिळवत बँकेतील सत्ता कायम ठेवली. धुळे तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून अनिकेत विजय पाटील हे भाजपपुरस्कृत एकमेव उमेदवार विजयी झाले.

धुळे तालुक्यात माजी मंत्री राेहिदास पाटील यांनी तर शिरपूरमध्ये आमदार अमरीश पटेल, तर साक्रीत शिवाजी दहिते पाेपट साेनवणे नंदुरबारमध्ये आमदार चंद्रकांत रघुवंशी, नवापूरमध्ये आमदार सुरूपसिंग नाईक यांनी काॅंग्रेससाठी किल्ला लढवला. राष्ट्रवादीची ताकद यात मर्यादित ठरली, तर भाजपतर्फे खासदार सुभाष भामरे यांनी जबाबदारी खांद्यावर घेऊन पॅनलची बाजू लढवली. त्यांना आमदार जयकुमार रावल यांनी साथ दिली. नंदुरबारमधूनही उदेसिंग पाडवी यांनी मदत केली. मात्र, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर आराेपांची करणाऱ्या आमदार अनिल गाेटे यांनी निवडणुकीपासून अलिप्त राहणे पसंत केले.

अध्यक्षसाठी रघुवंशी, कदमबांडेंची नावे चर्चेत
जिल्हाबँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे विधान परिषदेचे सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांची नावे चर्चेत आहे. यातही आमदार रघुवंशी यांना माेठी संधी आहे. काॅंग्रेसमधील सगळ्या गटांना जाेडण्याचे काम रघुवंशी यांनी वारंवार केले. त्यातच सध्याच्या संचालकांमध्ये काॅंग्रेसचेच सर्वाधिक संचालक आहेत. त्यामुळे रघुंवंशी यांनाच संधी मिळू शकते.

बँकेत आता सर्वाधिक संचालक काँग्रेसचेच
जिल्हा बॅंकेवर पुन्हा सत्ता मिळवणाऱ्या काॅंग्रेस मित्रपक्षांच्या पॅनलमधील १६ पैकी १५ जागा काॅंग्रेसच्या आहेत, तर एकमेव जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसची आहे. काॅंग्रेसच्या ग्रामीण भागात असलेल्या जाळ्याच्या बळावर ज्येष्ठ नेत्यांनी िजल्हा बॅंकेसाठी ताकद लागली. त्यामुळे काॅंग्रेसला यश मिळाले. आता चेअरमनपदासाठीही काॅंग्रेसच दावा करेल, असे चित्र आहे.