आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: अपूर्ण चलन पुरवठ्यामुळे एटीएममध्ये खडखडाट, खातेदारांना मनस्ताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - रिझर्व्ह बँकेतर्फे दरमहा जिल्ह्याला हाेणारा चलन पुरवठा एप्रिल महिन्यात कमी झाला. परिणामी एटीएममध्ये पुरेसे पैसे नसल्याने नागरिकांना गेल्या अाठ दिवसांपासून अडचणींना ताेंड द्यावे लागत अाहे. एटीएममधून पैसे निघत नसल्याने खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागताे. चलनाचा पुरवठा व्यवस्थित हाेईपर्यंत ही अडचण कायम राहणार अाहे. पैसे मिळत नसल्याने नाेटबंदीनंतर जशी स्थिती निर्माण झाली हाेती. तशी स्थिती पुन्हा झाली अाहे.
 
शहरात गुरुवार (दि.६)पासून एटीएममधून पैसे मिळण्यास अडचण येत अाहे. मार्च अखेर असल्याने रिझर्व्ह बँकेकडून जिल्ह्यातील बंॅकांना कमी प्रमाणावर चलन पुरवठा झाल्याने ही अडचण अाल्याचे सांगण्यात येत अाहे. मुख्य बाजारपेठेतील अाणि बँकेशेजारी असलेल्या एटीएमसह शहरात देवपूर, साक्री राेड, मालेगाव राेड भागात असलेल्या विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे नसल्याची सूचना देण्यात येत हाेती. ज्या ठिकाणी पैसे उपलब्ध अाहेत त्या एटीएमवर ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसून येत हाेते. पैसे शिल्लक नसलेल्या एटीएममध्ये बहुसंख्य हे राष्ट्रीयीकृत बँकांचे अाहेत.

दत्त मंदिर चाैकात असलेल्या पाच ते सात एटीएमपैकी केवळ महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये पैसे मिळत हाेते. स्टेट बँक हैदराबाद, युनियन बँक, वलवाडी स्टेट बँक अादी एटीएममध्ये दाेन दिवसांपासून पैसे नाहीत. तसेच वाडीभाेकर राेडवरील काही एटीएम पैशांअभावी बंदच अाहेत. एटीएममध्ये पैसे नसल्याने ग्राहकांची अडचण हाेत अाहे. महिन्याच्या सुरुवातीला अनेकांचे पगार हाेतात. त्यानंतर अनेकांनी रकमा काढल्याने काही प्रमाणावर चलनाचा तुटवडा जाणवत असल्याने एटीएममधून पैसे मिळण्यास अडचण हाेत असल्याचे सांगण्यात येत अाहे. दाेन दिवसांच्या सुटीनंतर साेमवारी परिस्थिती सुधारेल असे वाटत हाेते. मात्र, दुपारपर्यंत अनेक बँकेच्या एटीएममध्ये पैसेच नसल्याचे अाढळून अाले. यामागे रिझर्व्ह बँकेकडून हाेणार कमी चलन पुरवठा हेच असल्याबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुजाेरा देण्यात अाला अाहे.
 
यातही स्टेट बँकेच्या खातेदारांची अधिक अडचण झाली अाहे. स्टेट बँकेचे एटीएम असल्यास ते इतर बँकेचे सेंटर (यंत्र) स्वीकारत नाही. त्यांच्याकडून संबंधित बँकेच्या एटीएमचा वापर करण्याची सूचना केली जाते. शहरातील बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट असताना पाचशे शंभरच्या नोटा मिळणे अवघड झाले आहे. केवळ दोन हजार रुपयांच्याच नोटा अद्यापही बाहेर येतात.
 
जुन्या नाेटा टाकण्यास अडचण...
एटीएममध्ये प्रामुख्याने नव्या चांगल्या दर्जाच्या नाेटा टाकाव्या लागतात. त्यात दाेन हजार रुपयांच्या चलनी नाेटांचा कमी पुरवठा झाल्याने एटीएममध्ये इतर नाेटा कमी मावतात. दरमहा स्टेट बँकेला चार ते पाच काेटींचा नवीन चलन पुरवठा हाेताे. मात्र, या महिन्यात केवळ दाेन काेटींपर्यंतच पुरवठा झाला अाहे.
- रवी नायडू, क्षेत्रीय व्यवस्थापक, स्टेट बंॅक
बातम्या आणखी आहेत...