आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे कारागृहात दीडशे कैद्यांची दंततपासणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे: जवाहर फाउंडेशनतर्फे जिल्हा कारागृहातील कैद्यांची गुरुवारी मोफत दंततपासणी करण्यात आली. त्यासाठी जवाहर फाउंडेशनचे कर्मचारी आणि डॉक्टरांचे सहकार्य लाभले.
डॉ.अरुण दोडमणी, डॉ.विजय गडे, डॉ.शरुण बसप्पा, डॉ.सुदाम राठोड, डॉ.मोनाली पाटील, डॉ.रीना सुरी, डॉ.पूजा राठोड आदींनी कैद्यांची दंततपासणी केली. या वेळी कारागृहातील सुमारे 100 ते 150 कैद्यांची दंततपासणी करण्यात आली. मोराणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय व जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम दंतचिकित्सा महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि डॉक्टर उपस्थित होते.
डॉक्टरांनी कैद्यांना दातांची काळजी कशी घ्यावी यासह आरोग्याशी निगडीत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. शिबिराच्या सुरुवातीला कारागृह अधीक्षक बळवंत काळे यांनी डॉक्टरांचा सत्कार केला. या वेळी कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते.
अद्ययावत मोबाइल व्हॅन
दंत महाविद्यालयाने महिनाभरापूर्वी खरेदी केलेली अद्ययावत मोबाइल व्हॅन कारागृहाच्या आवारात दाखल झाली होती. या व्हॅनद्वारे जिल्हय़ातील दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा त्वरित उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.