आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट सिटी’च्या स्पर्धेतून महापालिका झाली अाउट!, यादीत नावच नसल्याची धक्कादायक बाब उघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- ‘स्मार्टसिटी’च्या योजनेत सहभागी होण्यापूर्वीच महापालिकेच्या चमूला परतीचा मार्ग धरावा लागला अाहे. उद्या मंगळवारी हाेणाऱ्या प्रदर्शनापूर्वीच याेजनेत सहभागी हाेण्याच्या भ्रमाचा भाेपळा फुटला अाहे. स्पर्धेपूर्वीच बाहेर पडण्याची नामुष्की अाेढवली अाहे. स्पर्धेत सहभागी हाेणाऱ्या मनपांच्या यादीत नावच नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली अाहे. त्यामुळे स्पर्धेपूर्वीच गाशा गुंडाळण्याची वेळ मनपाच्या अधिकाऱ्यांवर अाली अाहे.
स्मार्ट सिटीत सहभागी हाेता यावे, यासाठी अाठवडाभरापासून प्रस्ताव तयार केला जात हाेता. स्पर्धेत प्रदर्शनासाठी दहा ते पंधरा मिनिटांची एक डाक्युमेंट्री तयार करण्यात अाली. त्यात शहरातील महत्त्वाचे मुद्दे याेजना मांडण्यात आल्या. स्मार्ट सिटी होण्यासाठीच्या निकषात शहरातील नागरिकांसाठी असणाऱ्या िवविध प्रकारच्या सुविधा प्रदान करावयाच्या होत्या. त्याचप्रमाणे वर्षाला ५० कोटी रुपयांचा स्वनिधी कसा उभारणार याचाही गाेषवारा देण्यात अाला. सर्व निकषापर्यंत पोहाेचण्याचा महापालिकेने प्रयत्न केला. मंगळवारी मंत्रालयात स्मार्ट सिटीसाठी प्रेझेंटेशन होणार हाेते. त्यासाठी त्या महापालिकांना कळवण्यात येणार हाेते. मात्र, त्यापूर्वीच धुळे मनपाचा फुगा फुटला. या स्पर्धेत धुळे महापालिकेचे नाव वगळण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली अाहे. महापालिकेची सद्य:स्थिती भविष्यात करावयाची कामे यांचा समावेश प्रेझेंटेशनमध्ये केला होता. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता स्मार्ट सिटीत समावेश होणे कठीण अाहे. कारण सध्या महापालिकेत पूर्णपणे संगणकीकरणही झालेले नाही. वसुली पूर्णपणे होत नसून, थकबाकीचे प्रमाण मोठे अाहे. घरपट्टी पाणीपट्टी काही वर्षांनंतर दहा टक्के वाढविली आहे. त्याचप्रमाणे शहरातील शौचालय, सांडपाण्याचे नियोजन, पाणीपुरवठ्याची सुविधा या पायाभूत सुविधांमध्ये त्रुटी अाहेत. यानंतरही भविष्यात या योजनांच्या माध्यमातून त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट महापालिकेने घेतले होते. मात्र, स्मार्ट सिटीसाठी द्यावयाच्या मूल्यांकनात धुळे शहर बसल्यानेच धुळयाचा स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाचा विचार झालेला नाही.

अमृत योजनेसाठी करणार प्रयत्न
धुळे शहराचा राज्यातील स्मार्ट सिटीत समावेश होण्यासाठी महापालिकेतर्फे अधिकारी, महापौर पदाधिकाऱ्यांनी पुरेपूर प्रयत्न केले. मात्र, त्यात सहभागी होता आलेले नाही. असे असतानाही करण्यात आलेली तयारी वाटचाल याचे परिश्रम वाया जाणार नाही. कारण केंद्राची अमृत योजना आहे. त्यासाठी आता प्रयत्न करणार आहे. डॉ.नामदेव भोसले, आयुक्त, महापालिका, धुळे