आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dhule Municipal Corporation Commissioner Retired

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपा आयुक्तांसमोर समस्यांचा डोंगर !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे: महापालिकेचे आयुक्त हनुमंत भोंगळे सेवानिवृत्त झाल्याने, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. डॉ. करंजकर यांच्यासह ज्या कोणी अधिकार्‍याची आयुक्तपदी नियुक्ती होईल त्यांच्यासमोर शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासह पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे कामे पूर्ण करणे, मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणे आदी विविध प्रश्न सोडवण्याचे आव्हान असेल.
महापालिका गेल्या वर्षापासून चांगलीच चर्चेत आहे. महापालिकेच्या वसुली विभागात घडलेला अपहार आणि अग्निकांडाबाबत न्यायालयात सुरू असलेला खटला तसेच आणखी काही आरोपी त्यात अडकण्याची शक्यता असताना आयुक्त हनुमंत भोंगळे सेवानिवृत्त झाल्याने ही सर्व जबाबदारी आता प्रभारी आयुक्त डॉ. करंजकर यांच्यासह नव्याने नियुक्त होणार्‍या आयुक्तांवर येऊन पडली आहे. त्याचप्रमाणे गेल्या 10 दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठय़ाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव कोरडा झाल्याने ब्रिटिशकालीन गेट दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले; परंतु शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने मधेच तलावात चारी खोदून त्यातून हरणमाळचे पाणी सोडण्यात आले आहे. गेट दुरुस्त करण्याचे मोठे आव्हान डॉ. करंजकर यांच्यासमोर येणार्‍या नव्या आयुक्तांसमोर असेल. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईची समस्या जाणवणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागेल. याशिवाय पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून शहरातील नालेसफाई करण्यात येते; परंतु यंदा नालेसफाईचा ठेका न देता महापालिकेकडून नालेसफाई केली जात असल्याने पावसाळ्यापूर्वी हे काम करून घेण्याचे मोठे आव्हान आयुक्तांसमोर आहे. तसे न झाल्यास पावसाचे पाणी नाल्याच्या आजूबाजूला राहणार्‍या नागरिकांच्या घरात जाऊ शकते.