आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule Municipal Corporation Election BJP Seat Contro

धुळे मनपा जागावाटप 48 तासांत, विनोद तावडे यांची पत्रपरिषदेत माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिकेसह धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनपातील जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्याबाबतची घोषणा येत्या 48 तासांत केली जाईल, अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिली.

बुधवारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे जिल्हा दौर्‍यावर आले होते. गुलमोहोर विर्शामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका भाजप, शिवसेना, रिपाइंच्या महायुतीमार्फत लढण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत झाला आहे. त्यात जागावाटपाबाबतचा निर्णय हा जिल्हाध्यक्ष आणि संपर्कप्रमुखांनी स्थानिक पातळीवर घ्यावा, असे ठरले आहे. त्यानुसार स्थानिक पातळीवर चर्चा अंतिम टप्प्यात असून, येत्या 48 तासांत तसा निर्णय जाहीर केला जाईल इतकी चर्चा पुढे गेल्याची माहिती आपल्याकडे आहे. चर्चा करताना स्थानिक ताकद, पक्षाला असलेले वातावरण आदींसह इतरही मुद्दय़ांचा विचार करून निर्णय घेतला जात असतो. मोजक्या तीन-चार जागांबाबत मतभेद आहेत. त्याबाबतही चर्चेतून तोडगा निघेल, मराठा समाजाला आर्थिक, शैक्षणिक आरक्षण मिळावे, असे आपले मत असल्याचेही ते म्हणाले.

कायद्याचा धाक नाही
तिखी येथील अत्याचाराची घटना महाराष्ट्राला लाजवणारी आहे. पीडित मुलगी, आईची भेट घेऊन संपूर्ण माहिती आपण घेतली. ही घटना घडली याचा अर्थ कायद्याचा धाक राहिलेला नाही. घटनेचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. त्याला केवळ गती दिली गेली पाहिजे. पीडित महिलांसाठी शासनाने योजना घोषित केली ; परंतु त्याचा लाभ मिळतो किंवा नाही याचा आढावा कोणीच घेतलेला नाही.