आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule Municipal Corporation Election Last 8 Days

धुळे महापालिका निवडणूक : जाहीर सभांमधून आश्वासनांचा पाऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिका निवडणुकींतर्गत प्रचारासाठी शेवटचे आठ दिवस शिल्लक आहे. सर्वच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून शहरात ठिकठिकाणी प्रचारसभा होत आहेत. या सभांमधून विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मतदारांवर आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत. त्यामुळे मतदारांना कोणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिका निवडणुकीची प्रक्रिया गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झाली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात अर्ज छाननी, माघारी, चिन्ह वाटपाची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर खर्‍या अर्थाने उमेदवारांकडून प्रचाराला स्रुवात झाली. उमेदवारांनी पहिल्या टप्प्यात मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. दुसर्‍या टप्प्प्यात कार्यकाळात झालेली विकासकामे आणि भविष्यात करण्यात येणार्‍या विकासकामांची माहिती कार्यपुस्तिकेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यात आली. तिसर्‍या टप्प्यात प्रचार रॅली काढण्यासह प्रभागात जाहीर सभा घेण्यावर भर दिला जात आहे. या सभांसाठी पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, नेत्यांना बोलावण्यात येत आहे. या सभांना मतदारांची गर्दी होत आहे. या सभांमधून सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, उमेदवार मतदारांना विविध विकासकामांसह समस्या सोडविण्याचे आश्वासन देत आहेत. त्यात शहरातील स्वच्छता, पाणीप्रश्न सोडविण्यासह इतर आश्वासनांचा समावेश आहे.