आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपावर हिशेब देण्याची वेळ, दररोज होतोय फक्त दोन लाख रुपयांचा किरकोळ भरणा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेच्या वसुली व स्थानिक संस्था कर विभागातील अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे वसुली ठप्प झाली असून निवडणुकीपूर्वी रोज होणारा पाच ते सहा लाखांचा भरणा आता दोन ते अडीच लाखांवर येऊन ठेपला आहे. महापालिकेची डबघाईस आलेली आर्थिक परिस्थिती समजावून सांगण्यासाठी प्रशासनावर हिशेब देणारा फलक लावण्याची वेळ आली आहे.
महापालिकेची 15 डिसेंबरला तिसरी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरू असून या कामासाठी महापालिकेच्या विविध विभागातील प्रमुख अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात पाणीपुरवठा, बांधकाम, नगररचना, स्थानिक संस्था कर, लेखा, नगररचना, वसुलीसह विविध विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेच्या इतर कामकाजांवर परिणाम झाला असून वसुली व स्थानिक संस्था कर विभागाला मोठा फटका बसला आहे. स्थािनक संस्था कर विभागात केवळ तीन ते चार तर वसुली विभागात 10 ते 12 कर्मचारी कार्यरत असल्याने वसुली ठप्प झाली आहे. निवडणुकीपूर्वी रोज पाच ते सहा लाखांचा भरणा होत होता तो गेल्या काही दिवसांपासून दोन ते अडीच लाखांवर येऊन ठेपला आहे. महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हीच परिस्थिती असेल. वसुलीचे प्रमाण वाढत नसल्याने प्रशासनाला खर्चाचा ताळमेळ बसवताना मोठी कसरत करावी लागत आहे.