आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule Municipal Corproation Mayor Selection Process Start

प्रशासनाची महापौर निवडीसाठी तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिका निवडणुकीनंतर प्रशासनाने आता महापौर, उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार महापौर निवडीविषयी असलेले कायदे, परिपत्रक, शासन निर्णयाची माहिती संकलित करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

महापालिकेची निवडणूक नुकतीच झाली. त्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्वाधिक 34 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर आता सर्वांनाच महापौर, उपमहापौर निवडीचे वेध लागले आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मावळत्या महापौरांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला पूर्ण होत असल्याने त्यापूर्वी नव्या महापौरांची निवड करणे आवश्यक आहे. विभागीय आयुक्त अथवा त्यांनी नियुक्त केलेले पीठासीन अधिकारी महापौर, उपमहापौरांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करतील. तो पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिकेच्या नगरसचिव विभागाने तयारी सुरू केली आहे. ही प्रक्रिया राबवण्यासाठी शासनाने यापूर्वी पारित केलेली परिपत्रके संकलित केली जात आहेत.

उपमहापौरपदाची निवड
मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमानुसार शासन नियुक्त पीठासीन अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली बैठक होते. या बैठकीत आधी महापौरांची निवड होते. त्यानंतर नवनिर्वाचित महापौरांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौरांची निवड करण्यात येत होती. या नियमात आता बदल झाला असून, उपमहापौरांची निवड आता शासन नियुक्त पीठासीन अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

राजपत्राची प्रसिद्धी
नवनिर्वाचित नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याशिवाय महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जात नाही. त्यामुळे शासनाकडून नगरसेवकांची नावे तातडीने राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. याबाबत प्रशासनाकडून शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याने महापौर निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा या आठवड्यात केली जाईल. त्यासाठी विभागीय आयुक्त पिठासीन अधिकार्‍यांची नियुक्त करतील.