आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्याच्‍या महापौरपदी कल्पना महाले, उपमहापौरपदी उमेर अन्सारी यांची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- महापालिकेच्या महापाैरपदी राष्ट्रवादीच्या कल्पना महाले तर उपमहापाैरपदी उमेर अन्सारी यांची शुक्रवारी निवड करण्यात अाली. त्यांना अनुक्रमे 50 मते मिळाली. तर शिवसेनेच्या महापाैरपदाच्या उमेदवार ज्याेत्स्ना पाटील व भाजपच्या उपमहापाैरपदाच्या उमेदवार वालिबेन मंडाेरा यांना पराभव पत्करावा लागला. त्याना 14 मते पडली. पाच नगरसेवक यावेळी अनुपस्थित हाेते. त्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश महाले, त्यांच्या पत्नी मनिषा महाले काॅंग्रेसचे नगरसेवक इस्मार्सल पठाण, बसपाच्या सुशिलाबाई इशी यांचा समावेश हाेता. राष्ट्रवादीच्या सारिका अग्रवाल या तटस्थ राहिल्या. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे ५५ मतांची अाघाडी अाहे. मात्र नवीन महापाैर, उपमहापाैरांना केवळ ५५ मते मिळाली.